
Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी PAP ची लॉटरी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. पुनर्वसन प्रक्रियेबाबत स्पष्टतेच्या अभावामुळे निषेध नोंदवण्यात आलाय. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
घाटकोपर (पश्चिम) येथील 300 कोटी रुपयांच्या अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 62 प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या (PAP) पुनर्वसनासाठी होणारी लॉटरी स्थानिकांनी पुनर्वसन प्रक्रियेबाबत स्पष्टता मागितल्याने स्थगित करण्यात आली आहे. घाटकोपरमधील 220 हून अधिक कुटुंबांना अद्याप पुनर्वसन योजनेची माहिती नाही. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) रहिवाशांना त्यांच्या निवासस्थान रिकामे करण्यासाठी अंतिम नोटिसा बजावल्या. असे असताना सुमारे 220 कुटुंबांना पुनर्वसन योजनेबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
किती रुपयांचं बजेट?
2 एप्रिल 2024 रोजी राज्य सरकारने चिराग नगर येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी 305.62 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले. जिथे दलित कवी, लेखक आणि सामाजिक सुधारक अण्णाभाऊ साठे यांचे एकेकाळी वास्तव्य होते. ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ हे स्मारक, साहित्यिक दिग्गज आणि त्यांच्या उल्लेखनीय योगदानाला आदरांजली म्हणून काम करेल, तसेच सुमारे 220 झोपडपट्टी पुनर्वसन स्थळांचे नूतनीकरण करेल, अशी माहिती देण्यात आली.
नोटीसमध्ये काय म्हटलं?
स्थानिक लोक स्मारकाच्या बाजूने असले तरी, पुनर्वसन योजनेबाबत अनिश्चितता कायम असल्याचे दिसून आले आहे. जी नूतनीकरण आणि पुनर्वसन प्रकल्पाचे निरीक्षण करणाऱ्या SRA ने गेल्या आठवड्यात 62 घरांना अंतिम नोटिसा बजावल्या होत्या. ज्यामध्ये त्यांना कागदपत्रे सादर करून घरे रिकामी करण्यास सांगितले होते.
चिरागनगर येथील रहिवाशांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रस्तावित स्मारकासंदर्भात भेट घेऊन आपले प्रश्न, शंका आणि अपेक्षा याबाबत निवेदन सादर केले.
या संवादादरम्यान नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. पुढील कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांकडे योग्य त्या माध्यमातून पाठपुरावा करु असे… pic.twitter.com/sMf3ZfVpi4
— Sanjay Dina Patil (@SDPatil_16) July 27, 2025
SRA अधिकारी काय म्हणाले?
असे असताना 29 जुलै रोजी होणारी लॉटरी आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती SRA अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर रहिवाशांकडून एक निवेदन प्राप्त झाले, ज्यामध्ये त्यांनी पुनर्वसन प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मागितली आहे. आम्ही लॉटरी स्थगित केली असून पुढील तारीख जाहीर करू,” अशी माहिती रहिवाशांना अधिकाऱ्यांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.