
Spicejet : स्पाइसजेटची स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे आणि ती वाचवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी, स्पाईसजेटने QIP द्वारे 3000 कोटी रुपये उभे केल्याचा दावा केला..त्यानंतर स्पायजेटने डिसेंबरमध्ये सांगितले की त्यांनी दोन-तीन वर्षांत कर्मचाऱ्यांचे 160 कोटी रुपये दिले आहेत. तसेच जीएसटी, टीडीएस, कर्मचाऱ्यांच्या पगाराची थकबाकी यासह सर्व देणी दिल्याचं सांगितल जातंय. अजय सिंह यांनी दावा केलाय की QIP नंतर एअरलाइन्ससाठी एक नवीन प्रवास सुरू झाला आहे. पण हे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय..
एक मोठा प्रश्न असाही पडतो की, कंपनीची अवस्था एवढी वाईट असताना अचानक कंपनी नफ्यात कशी काय झाली, ही टर्नअराउंड स्टोरी आहे की ताळेबंदात फेरबदलाचा खेळ आहे? असा सवालही विचारला जातोय. एक एअरलाइन जी गेली 20 वर्षे चालू आहे पण ती नीट उड्डाण करू शकत नाही ती कशी बदलेल? स्पाइसजेटची फक्त 27 विमान उड्डाणं सुरू आहेत. 25 नादुरूस्त विमाने पुन्हा उड्डाण करण्याचा दावा केला जात आहे. नादुरूस्त विमाने एप्रिल 2025 पर्यंत उडवण्याचा दावा कंपनी करत आहे आणि या दाव्यांचा आधार QIP द्वारे उभारलेला पैसा आहे.
अजय सिंग म्हणातायेत, स्पाईसजेटच्या प्रवासातील हा एक नवा अध्याय आहे, सर्व थकबाकी भरून, भाडेकरू आणि कर्जदारांसोबतचे वाद मिटवून, आम्ही आमचे कार्य कुशलतेने चालवताना आमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जबाबदारी पार पाडत आहोत. सोबतच आमच्या आर्थिक उलाढालीच्या रणनीतीचे यश लक्षात घेता, आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याच्या आणि सतत विकास साधण्याच्या आमच्या क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे, असही अजय सिंग यांनी म्हंटल.
पण अजय सिंग यांचे दावे खरे आहेत का, कारण लोकांचा विमान प्रवासावरील विश्वास उडत चालला आहे. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने होत आहेत. कर्ज आणि थकबाकीच्या परतफेडीबाबत वाद सुरू आहे. पीएफचे पैसे देण्यास विलंब अशा समस्या निर्माण झाल्या. कंपनीने सर्व थकबाकी भरल्याचा दावा करूनही काही प्रश्न उपस्थित होत आहे, कारण काही कर्मचारी आणि कर्जदारांनी स्पाइसजेटवर खटला भरला आहे. अलीकडेच, स्पाइसजेटला नवीन दिवाळखोरीच्या दाव्यांचा सामना करावा लागत आहे, जे स्पष्टपणे दर्शविते की परिस्थिती सुधारलेली नाही. स्पाईसजेटला आता आयर्लंडमधील तीन विमान भाडेकरूंकडून दिवाळखोरीच्या दाव्यांचा सामना करावा लागत आहे.
एका माजी वैमानिकाने भाडे आणि उर्वरित थकबाकी न भरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारीपर्यंत, NCLT च्या दिल्ली खंडपीठाकडे अशा 15 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी काहींवर तोडगा निघाला आहे परंतु 7 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळेच बुडणाऱ्या विमान कंपन्यांना वाचवण्याची संधी आपल्याला वारंवार का मिळत आहे, असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.