digital products downloads

अदानींच्या संपत्तीत 13% वाढ; तेवढीच घट हाेऊनही अंबानी सर्वात धनाढ्य!: भारत तिसरा मोठा अब्जाधीशांचा देश कायम

अदानींच्या संपत्तीत 13% वाढ; तेवढीच घट हाेऊनही अंबानी सर्वात धनाढ्य!:  भारत तिसरा मोठा अब्जाधीशांचा देश कायम

  • Marathi News
  • National
  • Adani’s Wealth Increases By 13%; Ambani Remains The Richest Despite The Same Decrease! India Remains The Third Largest Country With Billionaires

नवी दिल्ली1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

भारत २०२८ मध्ये जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. देशाने तिसऱ्या मोठ्या अब्जाधीशांचा वकूबही कायम ठेवला आहे. गुरुवारी प्रसिद्ध हुरुनच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत (हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५) देशात अब्जाधीशांची संख्या वाढून २८४ झाली. त्यात १३ नवे अब्जाधीश आहेत. अमेरिकेने ८७० अब्जाधीशांसह (+७०) चीनला मागे सारून अव्वल स्थान गाठले. १० वर्षांत पहिल्यांदाच चीन ८२३ (+९) अब्जाधीशांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताचे अव्वल १० श्रीमंत अब्जाधिश संपत्ती मुकेश अंबानी ८.६ गौतम अदानी ८.४ रोशनी नाडर ३.५ दिलीप सांघवी २.५ अजीम प्रेमजी २.२ कुमार मंगलम बिर्ला २.० सायरस पुनावाला २.० नीरज बजाज १.६ रवि जयपुरिया १.४ राधाकृष्ण दमानी १.४ (संपत्ती लाख कोटी रुपयांत)

देशातील दोन प्रमुख उद्योगपतींमधील स्पर्धेत मुकेश अंबानी यांची संपत्ती घटूनही ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले. त्यांची एकूण संपत्ती वर्षात १ लाख कोटींनी घटून (१३%) ८.६ लाख कोटी झाली. त्यामुळे ते अव्वल-१० च्या यादीतून बाहेर पडले. दुसरीकडे उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती वर्षभरात सर्वाधिक १ लाख कोटी रुपयांनी वाढून (१३%) ८.४ लाख कोटी रुपये इतकी झाली. मात्र ते यादीत १८ व्या स्थानावर आहेत.

रोशनी नाडर… प्रथमचअव्वल १० महिलांत

एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या चेअरपर्सन ४३ वर्षीय रोशनी नाडर यांचा देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत प्रथमच समावेश झाला. त्यांनी थेट अव्वल १० मध्ये जागा पटकावली. ३.५ लाख कोटी रुपयांसह त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. जगातील १० सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीतही त्या पाचव्या क्रमांकावर.

मुंबई आता अब्जाधिशांची राजधानी नाही

शांघायने प्रथमच मुंबईकडून आशियातील अब्जाधिशांचा किताब हिसकावला.येथे ९२ अब्जाधिश आहेत, तर मुंबईत त्याहून २ कमी म्हणजे ९० अब्जाधिश आहेत.

२८४ पैकी १०९ अब्जाधिशांची संपत्ती घटली

भारतातील अब्जाधिशांची एकूण संपत्ती आता ९८ लाख कोटी रुपये आहे. ती भारतीय जीडीपीच्या एक तृतियांश आणि सौदी अरबच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेहूनही जास्त आहे. २८४ अब्जाधिशांपैकी १७५ जणांची संपत्ती वाढली, तर १०९ अब्जाधिशांची संपत्ती घटली वा काही बदल झाला नाही.

सर्वाधिक तरुण अब्जाधिशि

यादीत भारताच्या १३ अब्जाधिशांना प्रथमच समाविष्ट करण्यात आले. त्यात रोजरपेचे सह-संस्थापक शशांक कुमार आणि हर्षिल माथुर यांचा समावेश आहे. दोघांचे वय ३४ वर्षे आणि संपत्ती ८,६४३ कोटी रुपये आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp