
Meghana Bordikar video : राजकारणातील बेताल वक्तव्ये आणि रागीट स्वभावामुळे अनेकदा लोकप्रतिनिधी चर्चेत येतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. जिथे महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री आमदार मेघना बोर्डीकर यांनी एका कर्मचाऱ्यावर थेट राग काढला आणि त्याला सर्वांसमोर कानाखाली मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या व्हिडीओमुळे वादात सापडल्या आहेत. ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलाय. टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर कोणत्या अधिकारात देऊ शकतात असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
सभागृहात रम्मी खेळणारे. पैशांच्या बॅगा भरणारे.डान्सबार चालवणारे. आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे. यामध्ये भर पडली ती आता थेट आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी दिल्याने.
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर कोणत्या अधिकारात देऊ शकतात?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..! असं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सभागृहात रम्मी खेळणारे…
पैशांच्या बॅगा भरणारे…
डान्सबार चालवणारे…
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट… pic.twitter.com/rRMbQsPHde
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 2, 2025
मेघना बोर्डीकर यांच्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
एका सभेदरम्यान मेघना बोर्डीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला उद्देशून रागाने म्हटले की, असं कुणाचं काम केलं ना तर याद राख, कानाखाली मारीन! पगार कोण देते हे माहित आहे? आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायची नाही. याद राख! तू काय कारभार करतो, हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे. हमाली करायची ना, तर सोडून दे नोकरी!
या वक्तव्यामुळे सभेत वातावरण तणावपूर्ण झाले आणि उपस्थित कर्मचारी गप्प झाले. ही संपूर्ण घटना उपस्थितांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.