
- Marathi News
- National
- Vice President Dhankhar’s Resignation 2 Years Ago, Vice President’s Resignation, 10 Days Ago Had Said Will Retire In 2027
नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर अवघ्या १२ तासांतच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. ७४ वर्षीय धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव तत्काळ पायउतार होत कलम ६७ (अ) अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. ‘देवाने आशीर्वाद दिला तर मी ऑगस्ट २०२७ मध्ये निवृत्त होईन,’ असे ते १० जुलै रोजी एका कार्यक्रमात म्हणाले होते. धनखड हे राजीनामा देणारे तिसरे उपराष्ट्रपती आहेत, तर आरोग्याच्या कारणास्तव पद सोडणारे ते पहिले उपराष्ट्रपती आहेत.
पुढे काय ? नव्या उपराष्ट्रपती निवडीची घटनेत कोणतीही कालमर्यादा नाही
उपराष्ट्रपतींचा राजीनामा स्वीकारला गेला तर नवीन उपराष्ट्रपती निवड होईपर्यंत राज्यसभेचे उपसभापती त्यांच्या जागी राज्यसभेचे सभापती असतील. तथापि, उपसभापतींना उपराष्ट्रपतिपदाचा कार्यभार मिळणार नाही. जर उपराष्ट्रपतिपद रिक्त असेल आणि राष्ट्रपतीदेखील अनुपस्थित असतील, म्हणजेच ते देशाबाहेर असतील, तर अशा परिस्थितीत राष्ट्रपतींचा कार्यभार भारताच्या सरन्यायाधीशांकडे सोपवला जातो. याचे उदाहरण म्हणजे न्यायमूर्ती एम. हिदायतुल्लाह आहेत. १९६९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन झाले, तेव्हा उपराष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी राष्ट्रपती झाले. परंतु जेव्हा त्यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला, तेव्हा भारताचे सरन्यायाधीश एम. हिदायतुल्लाह यांनी तीन आठवडे राष्ट्रपतिपदाचा कार्यभार स्वीकारला.उपराष्ट्रपतिपद रिक्त झाल्यानंतर किती दिवसांनी निवडले जावे याची घटनेत कालमर्यादा नाही. खासदार, आमदार किंवा राष्ट्रपतींप्रमाणे या पदासाठी सहा महिन्यांची मुदत नाही.
स. ११ वाजता आसनावर… राज्यसभा स्थगित, पण थांबले नाही, निघून गेले
गत महिन्यात छातीत दुखत होते, मार्चमध्ये एम्समध्ये दाखल… २५ जून रोजी उत्तराखंडमधील एका कार्यक्रमादरम्यान धनखड यांना छातीत दुखू लागले. त्याआधी ९ मार्च रोजी छातीत दुखण्यामुळे ते दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाले होते. १२ मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
- धनखड यांच्या राजीनाम्यामुळे अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झाले. तर्कवितर्कही सुरू झाले.
- धनखड यांनी २० जुलै रोजी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त संसद कर्मचारी व लोकसभा टीव्ही कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. उपराष्ट्रपती असताना असा भव्य कार्यक्रम पहिल्यांदाच झाला होता.
- सोमवारी, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सकाळी ११ वाजता ते आसनस्थ झाले. त्यांनी आठ नवीन सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथही दिली. राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतरही ते संसदेत दिसले.
- ऑपरेशन सिंदूरवरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत होते. धनखड यांनी त्यांना रोखले नाही. खरगे म्हणाले की ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचे २६ वेळा म्हटले आहे. एकेकाळी सभागृह नेते जेपी नड्डा यांनीही म्हटले होते की काहीही रेकॉर्डवर चालत नाही. अशा सूचना अध्यक्षांकडूनच दिल्या जातात.
- दुपारी ४ वाजता, २३ तारखेला त्यांच्या जयपूर दौऱ्याचा कार्यक्रमही जाहीर झाला. सायंकाळी ५.३० नंतर अनेक विरोधी खासदारांनी त्यांची भेट घेतली.
सूत्रांनुसार, सायंकाळी ६ वाजता, त्यांना सत्ताधारी पक्षाकडून संदेश मिळाला की न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या सूचनेसाठी ५० हून अधिक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत, परंतु या स्वाक्षऱ्या फक्त विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या होत्या.पीडीटी आचारी, घटनातज्ज्ञ
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.