digital products downloads

अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी: शिवसेना खासदारांची घेतली बैठक, मित्रपक्षांच्या असहकार्याचा ‘रिपोर्ट’ भाजपसमोर ठेवणार? – Mumbai News

अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी:  शिवसेना खासदारांची घेतली बैठक, मित्रपक्षांच्या असहकार्याचा ‘रिपोर्ट’ भाजपसमोर ठेवणार? – Mumbai News


राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा धुराळा उडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आज (मंगळवार, दि. १७) ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, या दौऱ्यात आगामी निवडणुकांचे ज

.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने एक गोपनीय अहवाल तयार केला आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांच्या असहकार्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि समन्वय अधिक घट्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अहवाल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडून आपली भूमिका आक्रमकपणे मांडू शकतात.

दिल्लीत खासदारांची घेतली भेट

दिल्लीत आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाची भूमिका काय असावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात पसरवल्या जाणाऱ्या ‘फेक नॅरेटिव्ह’चा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांनी आक्रमक व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक आव्हाने आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यावर केंद्र सरकारच्या उपाययोजनांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘पक्ष नाव व चिन्हा’बाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा

एकनाथ शिंदे हे राजकीय चर्चांसोबतच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या न्यायालयीन लढाईबाबतही शिंदे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. या कायदेशीर लढाईत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी ते स्वतः वकिलांच्या भेटी घेऊन आढावा घेत आहेत.

उद्या देवेंद्र फडणवीसही दिल्लीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्या (बुधवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘केंद्रीय संचलन समिती’ची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तिकीट वाटप आणि निवडणूक रणनीतीवर खलबतं होणार असून, महाराष्ट्रातील दोन्ही बड्या नेत्यांच्या दिल्ली भेटींमुळे महायुतीच्या आगामी वाटचालीचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा…

शिखर बँक घोटाळा प्रकरणाची फाईल बंद:विशेष न्यायालयाने ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीन चिट

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांना या प्रकरणात विशेष न्यायालयाने पूर्णतः ‘क्लीनचीट’ दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सादर केलेला ‘सी-समरी’ (Closer Report) न्यायालयाने अधिकृतपणे मंजूर केल्याने आता हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial