
सण, उत्सव, गौराईचे आगमन-विसर्जन आणि गणेशोत्सव यामुळे सध्या ठिकठिकाणी मोठ-मोठे भंडारे (जेवनावळी) आयोजित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अन्नही बरेच उरते. ते अन्न तसेच फेकले जाते. त्यामुळे वाया जाणारे हेच अन्न गरीब व गरजूंच्या उपयोगी पडावे
.
हे अन्न संबंधित मंडळ, व्यक्ती यांच्याकडून संकलित करुन ते गरजूंपर्यंत पोचविण्याची सोय ग्रुपने उपलब्ध करुन दिली आहे. किंवा सूचना मिळण्याआधीच अन्न खराब झाले असेल तर वडाळी किंवा छत्री तलाव भागात जाऊन ते जमीनीत पुरविण्याचे काम केले जात आहे. ‘अन्नाची कदर-शेतकऱ्याचा आदर-जनआरोग्याची दखल’ ही या ग्रुपची टॅगलाइन आहे. त्यानुसार ते गेल्या आठ वर्षांपासून शहर स्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या निकोप ठेवण्यासाठी झटत आहेत. एम.एच.- २७ एटीएस ग्रुपच्या या उपक्रमात माजी महापौर प्रमोद पांडे, मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. प्रवीण गुल्हाने, प्रा. समीर चौधरी, किशोर कडू, वासुदेव अवसरे, आनंद केने, अनिरुद्ध क्षीरसागर, छाया कडू, संगीता गजभिये, वंदना भटकर, जयश्री निंभोरकर, मोनाली आगाशे व त्यांचे सहकारी सहभागी झाले आहेत. स्वत:चे दैनंदिन कामकाज सांभाळून हे सर्वजण या कामासाठी वेळ काढतात, ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे इतरांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सव, महालक्ष्मी माता, नवरात्री उत्सव दरम्यान अनेक ठिकाणी भोजनावळी असतात. नागरिक आनंदाने आपले आप्तस्वकीय, इष्टमित्र यांना निमंत्रित करतात. शेकडो नागरिकांचा त्यांचा अंदाज असतो. परंतु बरेचदा तो चुकतो. त्यामुळे बरेच अन्न शिल्लक राहते. शिल्लक राहिलेल्या या अन्नाची ऐनवेळी कशी विल्हेवाट लावावी, हा मोठा प्रश्न त्यावेळी निर्माण होतो. शेवटी ते अन्न एकतर गुरांपुढे मांडले जाते, नाहीतर निर्जन ठिकाणी फेकून दिले जाते. अशी वेळ कुणावरही येऊ नये, उलट त्या अन्नाचा विनियोग व्हावा, यासाठी सदर ग्रुप काम करतो. ग्रुपचे सदस्य संबंधितांपर्यंत पोहचून शिल्लक राहिलेले अन्न गरीब व गरजूंपर्यंत पोचवतात किंवा खराब झाले असेल तर जमीनीत पुरतात. हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून सतत सुरु असून त्यासाठी त्यांनी एकप्रकारची हेल्पलाईनही गठित केली आहे. दरम्यान सलग आठ वर्षांपासून योग्य मार्गाने अन्नाची विल्हेवाट लावणारा हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवणे आजची गरज आहे, या शब्दात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व उपअभियंता नितीन बोबडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्याप्रमाणेच सहायक क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांनीही सदर उपक्रमाचे कौतुक केले असून शहराच्या निरनिराळ्या भागातील नागरिकांनीही या उपक्रमाचे अनुकरण करावे, असा आग्रह धरला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.