
Mumbai Man Set Womens Home On Fire: मुंबईतील बोरिवली येथे एका धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांना वापरल्या जाणाऱ्या लेनमध्ये अडथळा आणल्याच्या वादातून एका पुरुषाने महिलेच्या घराला आग लावल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी बोरिवली पश्चिमेतील गोराई परिसरातील भीमनगरमधील लेन क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली.
नेमका वाद काय झाला?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विशाल उधमले नावाचा संशयित सागर तरंग बिल्डिंगजवळील गल्लीच्या मध्यभागी खुर्चीवर बसून वाटसरूंना अडवत असताना हा वाद सुरू झाला. परिसरातील रहिवासी असलेल्या लक्ष्मी बोंटला या पीडित महिलेने त्याला खुर्ची रस्त्याहून बाजूला घेण्याची विनंती केली. ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. शाब्दिक भांडणाचे लवकरच शिवीगाळात रूपांतर झाले. विशाल या वादामुळे प्रचंड चिडला आणि तिथून निघून गेला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं कृत्य
मात्र, विशालने हे प्रकरण इथे सोडलं नाही. 1 एप्रिलच्या पहाटे 2.30 च्या सुमारास तो कथितरित्या परतला. त्याने लक्ष्मीच्या घरावर पेट्रोल शिंपडले आणि पेटवून दिले.
घटनेच्या वेळी लक्ष्मी घरात नसल्याने त्या वाचल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हे संपूर्ण कृत्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
नक्की वाचा >> बार्शी हादरली! मेव्हण्याचे नणंदेबरोबर अनैतिक संबंध; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीने ट्रिमरने…
नागरिकांना धमकावलं
सीसीटीव्ही फुटेजमद्ये विशाल लक्ष्मी यांच्या घरावर पेट्रोल टाकताना आणि आग लावताना दिसत आहे. या घटनेनंतर, विशालने कथितरित्या इतर रहिवाशांनाही धमकावलं. घडलेल्या प्रकरासंदर्भात कोणीही पोलिसांत गुन्हा नोंदविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी विशालने परिसरातील नागरिकांना दिली. जळणारं घर आणि विशालचा अवतार तसेच त्याने दिलेल्या धमकीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लक्ष्मी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विशालविरुद्ध बीएनएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नक्की पाहा > पत्नीकडून पतीला बेदम मारहाण! आई अन् भावासमोरच…; छुप्या कॅमेरात कैद झाला Video
सासरवाडीत झालेला अपमान
महिलेने अडवणूक करून त्याच्याशी भांडण केल्याने आरोपी सासरच्या घरी आल्याचे चौकशीत उघड झाले. त्याला सासरच्या घरी अपमानित वाटलं आणि रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले, असे बोरिवली पोलिसातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. आरोपीला अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.