digital products downloads

अमरावतीत ‘मुख्यमंत्री सावत्र बहीण’ मोर्चाची स्थापना: KYC न झाल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून महिला वंचित – Amravati News

अमरावतीत ‘मुख्यमंत्री सावत्र बहीण’ मोर्चाची स्थापना:  KYC न झाल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून महिला वंचित – Amravati News



‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांनी अमरावतीत ‘मुख्यमंत्री सावत्र बहीण’ महिला मोर्चाची स्थापना केली आहे. केवळ ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांचा ऑक्टोबर २०२५ पासून योजनेचा हप्ता बंद झाला आहे. हा हप्ता पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या महिलांच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ‘केवायसी’ करण्याची अंतिम मुदत होती, परंतु ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या, सेतू केंद्रांवरील ताण, वीजपुरवठ्यातील अडथळे आणि ओटीपी न मिळणे यांसारख्या कारणांमुळे त्या वेळेत प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. पात्र असूनही त्यांचे लाभ रोखण्यात आल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघटनेच्या नेतृत्वाखाली या महिलांनी ‘केवायसी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर नजीकच्या भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘मुख्यमंत्री सावत्र बहीण’ महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिला गरीब आणि गरजू आहेत. त्यांच्याकडे चारचाकी वाहन किंवा शेती नाही; त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शासनाने त्यांचे हप्ते रोखून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी आहोत का?” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक डॉ. कटके यांनी या महिलांचे निवेदन स्वीकारले. शासनाकडे त्यांची भूमिका कळवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयानंतर हा मोर्चा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयावरही नेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाला पत्राद्वारे कळवण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनेही या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. या आंदोलनात प्रधान मुखिया सरपंच संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष तथा खेडपिंप्रीचे सरपंच मंगेश कांबळे, शारदा कोडापे, प्रा. उद्धव पारवे, पार्वता राऊत, जयश्री विटकरे, शालू खंडारे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp