digital products downloads

अमरावती विद्यापीठात आता दर तीन महिन्यांनी कामाचा आढावा: महापालिका, जिल्हा परिषदेच्या धर्तीवर प्रशासकीय बैठका – Amravati News

अमरावती विद्यापीठात आता दर तीन महिन्यांनी कामाचा आढावा:  महापालिका, जिल्हा परिषदेच्या धर्तीवर प्रशासकीय बैठका – Amravati News



संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सर्व प्रशासकीय आणि शैक्षणिक विभागप्रमुखांच्या बैठका दर तीन महिन्यांनी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कामकाजात समन्वय राखण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिसभा सदस्य गिरीश शेरेकर यांनी मांडलेला हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकांमध्ये विद्यापीठातील सर्व प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक विभागप्रमुख, अध्यासन व अभ्यासकेंद्र प्रमुख तसेच समन्वयक सहभागी होतील. गिरीश शेरेकर यांच्या मूळ प्रस्तावानुसार, या बैठका दर महिन्याला आयोजित करून मागील महिन्यातील कामांचा आढावा आणि पुढील महिन्यातील कामांचे सादरीकरण अपेक्षित होते. मात्र, अधिसभेत झालेल्या चर्चेनंतर कुलगुरूंनी दर महिन्याऐवजी दर तीन महिन्यांनी बैठक घेण्याचे निर्देश देत प्रस्ताव मंजूर केला. महापालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धर्तीवर विद्यापीठातही कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अशा बैठका घेण्याचा उद्देश होता. या निर्णयामुळे विद्यापीठाचे कामकाज अधिक गतिमान होईल आणि वेळेवर कामे पूर्ण होतील, असा विश्वास अधिसभा सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp