
पाणी बचतीसह आरोग्य, पर्यावरणीय उपक्रम तसेच कौशल्य विकासातून सामाजिक वृद्धी, महिला सशक्तीकरण आणि आदिवासी आश्रमशाळा अशा सामाजिक उपक्रमांसाठी भरीव योगदान देणाऱ्या अमानोरा येस फाउंडेशनचा रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131च्या वतीने सीएसआर पुरस्कार देऊन गौर
.
सामाजिक क्षेत्रात सकारात्मक आणि भरीव कार्यातून योगदान देत मूलभूत बदल घडवण्यासाठी नामांकित उद्योग समूहांचा गौरव करण्यात येतो. हयात रिजन्सी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक अर्थव्यवस्थेतील उल्लेखनीय सेवेबद्दल अमानोरा येस फाउंडेशनचा गौरव करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शीतल शहा यांच्यासह व्हाईस ॲडमिरल कमांडट (एनडीए) गुरुचरण सिंह, राकेश भार्गव, रवी कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन तसेच ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रातील सामाजिक उपक्रमांसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 52 आस्थापनांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
अमानोरा टाउनशिप येथे पाणी बचतीचा संदेश देत पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. निरोगी समाजाचे ध्येय मनात ठेऊन समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून येस फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. कौशल्य विकास साधल्यास सामाजिक वृद्धी होते या भावनेतून कौशल्य शिक्षणासोबतच सामुदायिक जाणीव निर्माण केली जाते. समाजातील विविध घटक आजही शिक्षणापासून वंचित राहिले आहेत या पैकी पारधी समाजातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे या करीता यस फाउंडेशनतर्फे खामगाव येथे सूर्येादय पारधी आश्रमशाळा दत्तक घेतली आहे. तसेच महिला सशक्तीकरण, क्षुधा-शांती योजना आणि सूर्योदय बालगृह देखील चालविले जाते. या कार्याची दखल घेऊन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे गौरव करण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.