digital products downloads

अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष वेन्स 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; भव्य स्वागत: पंतप्रधान मोदींना भेटले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ​​​​​​​वेन्स… ट्रेड डील आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा

अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष वेन्स 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; भव्य स्वागत:  पंतप्रधान मोदींना भेटले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ​​​​​​​वेन्स… ट्रेड डील आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा
  • Marathi News
  • National
  • US Vice President Vance Meets Prime Minister Modi… Discusses Trade Deal And Defense Cooperation, US Vice President Vance On 4 day Visit To India; Grand Welcome

नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारत-अमेरिका व्यापार करार आणि ट्रम्प टेरिफवर राजकीय गोंधळ सुरू असताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेन्स सोमवारी नवी दिल्लीत पोहोचले. या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या वेन्स यांनी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उभयतांत व्यापार करार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य व इतर महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. सप्टेंबरपर्यंत भारत व अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी वेन्सना २०४७ पर्यंत विकसित भारताच्या रोडमॅप व तयारीची माहिती दिली. ते म्हणाले, जानेवारीत अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या यशस्वी भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध मजबूत झाले. सोमवारी सकाळी पालम विमानतळावर वेन्स, त्यांची पत्नी उषा आणि तीन मुलांचे भव्य स्वागत करण्यात आले. १२ वर्षांत कोणत्याही अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. २०१२ मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती जे बायडेन भारतात आले होते.

मोदी म्हणाले : यंदा अध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत भेटीने संबंध बळकट होतील

पंतप्रधान मोदी म्हणाले, यंदा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रस्तावित भारत यात्रा आहे. त्याबद्दल उत्सुक आहे. या दौऱ्यातून उभय देशांतील संबंध आणखी बळकट होतील. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यंदा क्वॉडच्या बैठकीसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत.

आज जयपूर : वेन्स प्रख्यात आमेर किल्ला पाहणार, इंटरनॅशनल सेंटरमध्ये मार्गदर्शन

वेन्स मंगळवारी जयपूरजवळील आमेर किल्ल्याला भेट देतील. दुपारी राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रात मार्गदर्शन करतील. २३ एप्रिलला आग्रा येथे ताजमहाल, शिल्पग्रामला भेट देतील. २४ एप्रिल रोजीच वेन्स जयपूरला परतून कुटुंबासह अमेरिकेला रवाना होतील.

मोदींनी आपल्या निवासस्थानी वेन्स यांच्या मुलांना मोरपंख दिले भेट

उपराष्ट्राध्यक्ष वेन्स सोमवारी सायंकाळी उशिरा कुटुंबासह पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी ७, लोककल्याण मार्ग येथील सरकारी निवासस्थानी पोहोचले. मोदींनी वेन्स यांच्या इवान, विवेक, मिराबेल या तीन मुलांना मोरपंख भेट दिले. मुले मोरपंखाशी खेळत होते.

अक्षरधाम मंदिराचे दर्शन केले, वेंन्स- मुले आनंदी झाली

वेन्स यांनी पत्नी उषा व मुलांसह अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतले. मुलगा इवान, विवेक यांनी कुर्त पायजामा, मुलगी मिराबेलने अनारकली ड्रेस परिधान केला होता. वेन्स म्हणाले, येथे येऊन मुले आनंदी झाली. वेन्स कुटुंबाला लाकडी हत्ती, मंदिराचे मॉडेल व मुलांना पुस्तके भेट मिळाली.

चीनचा संतप्त इशारा… कोणत्याही देशाने अमेरिकेशी व्यापार करार केला तर आम्ही कारवाई करू

भारताने स्टेनलेस स्टीलवर १२% कर लावला

भारताने स्टेनलेस स्टीलवर १२% तात्पुरता कर लादला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कराला सेफगार्ड ड्यूटी असे नाव देण्यात आले आहे. चीनमधून स्वस्त दरात भारतात पोलादाची डंपिंग रोखणे हा यामागील उद्देश आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कर पुढील २०० दिवसांसाठी असेल. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या स्टीलचा निर्यातदार, दुसऱ्या क्रमांकाचा स्टेनलेस स्टील आयातदार देश आहे.

अमेरिकेसोबत विविध देशांच्या संभाव्य व्यापार करारांमुळे चीन नाराज आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, टेरिफपासून बचावासाठी अमेरिकेशी व्यापार करार करणाऱ्या देशांनी चीनच्या व्यापारी हितसंबंधांना धक्का लावला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भारत आणि अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप देत असताना चीनचे हे विधान आले आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ट्रम्प यांनी चीनवरील २४५% कर कायम ठेवला आहे तर इतर देशांना ९० दिवसांची कर सूट दिली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp