
CSMT 85 Day Mega Block: मध्य रेल्वेने एक मोठं काम हाती घेतलं असून त्यानिमित्ताने तब्बल 85 दिवसांचा मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे कोकणाबरोबरच देशाच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांना फटका बसणार आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची सुरुवात पुढील तीन महिने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादरवरुन केली जाणार आहे. तर अनेक गाड्या केवळ दादरपर्यंत धावणार आहेत. कोणाबरोबरच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मुख्य फटका बसणार आहे. हे काम रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (आरएलडीए) द्वारे हाताळले जात आहे. नेमका हा बदल आहे तरी काय जाणून घेऊयात…
प्रवाशांची गैरसोय
मध्य रेल्वेने 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत प्लॅटफॉर्मवर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेससह अनेक मेल/एक्स्प्रेस दादर स्थानकातून सुटणार आहेत. मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत धावणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल – करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
85 दिवस ब्लॉक
रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत (आरएलडीए) सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्र. 16 व 17 वन पुढील 85 दिवस ब्लॉक असणार आहे. या काळात दोन्ही प्लॅटफॉर्मवरील रेल्वे वाहतूक बंद ठेवून तेथे पायाभूत व इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीपासून अप दिशेने येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस पुढील सुचना मिळेपर्यंत दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. दादरबरोबरच अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या सीएसएमटीऐवजी ठाणे, कल्याण किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) पर्यंतच धावतील किंवा तेथूनच सुटतील.
या गड्यांवर होणार परिणाम
मार्गात बदल करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, बिदर-सीएसएमटी एक्स्प्रेस, लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश असेल. तसेच मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येणार आहे.
2450 कोटी रुपयांचा खर्च
सीएसएमटी हे ऐतिहासिक आणि जागतिक वारसा दर्जाचे स्थानक आहे. त्याच्या पुनर्विकासासाठी डिसेंबर 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली. एकूण खर्च सुमारे 2450 कोटी रुपये अपेक्षित आहे. प्लॅटफॉर्मच्या कामाबरोबरच स्थानकाची देखरेख आणि शुशोभिकरणाचं कामही केलं जाणार आहे. हे काम टप्प्याटप्प्यात केलं जाणार असून सध्या दोन महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मचं काम हाती घेण्यात आलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



