digital products downloads

अशा विकृत मनोवृत्तींना फाशीची शिक्षा द्यावी: अशोक खरात प्रकरणी सुनील तटकरेंची मागणी, संबंधित व्यक्तींवरही कारवाईची मागणी – Dharashiv News

अशा विकृत मनोवृत्तींना फाशीची शिक्षा द्यावी:  अशोक खरात प्रकरणी सुनील तटकरेंची मागणी, संबंधित व्यक्तींवरही कारवाईची मागणी – Dharashiv News



नाशिकचा भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांसोबतचे लैंगिक संबंध असोत, किंवा जमीन घोटाळा असेल तसेच भोंदुगिरी, या सगळ्यामुळे खरातचा पाय चांगलाच खोलात अडकला आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. ते धाराशिवमध्ये आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. सुनील तटकरे म्हणाले, खरात असो कोणीही असो, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्यावी. जलद गती न्यायालयात टाकून जे काही फाशीची शिक्षा द्यायची आहे ती दिली जावी. सरकारने एसआयटीच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा ज्यांचा कळत नकळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज सोलापूर दौऱ्यावर असून ते पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर येथे देवदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने पक्षात नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींनंतर सुनील तटकरे पहिल्यांदाच सोलापुरात दाखल झाले असून रात्री उशिरा आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आजचा संपूर्ण दिवस ते धार्मिक दर्शनासाठी व्यतीत करणार असून, पत्रातील ओमीट केलेल्या नावांच्या वादंगानंतरच्या त्यांच्या या पहिल्याच दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp