
ममुराबाद मार्गावरील विदगाव जवळच्या तापी नदी पुलावर मंगळवारी रात्री 10.30 वाजता अत्यंत भीषण अपघात झाला.वाळूने भरलेल्या बेदरकार डंपरने कारला दिलेल्या धडकेत शिक्षिका मीनाक्षी नीलेश चौधरी (वय 38)आणि तिचा मोठा मुलगा पार्थ (वय14) यांचा जागीच मृत्यू
.
याप्रकरणी डंपरचालक दीपक दगडू ठाकूर(रा. डांभुर्णी) यास अटक करण्यात आली आहे. अपघातात चौधरी कुटुंबाची कार थेट पुलाचे कठडे तोडून 50 ते 60 फूट खोल नदीपात्रात झुडपात कोसळली.अपघातानंतर परिसरात गर्दी झाली.परंतु कार दिसत नव्हती. मात्र,कारमधील जखमी चिमुकला ध्रुवयाचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो रडत असल्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी खाली धाव घेतली व अपघातग्रस्त कारचा शोध लागला.
मूळचे चोपडा येथील रहिवासीव धानोऱ्याच्या ए.व्ही. मिशन शाळेतील शिक्षक नीलेश चौधरी जळगावात विठ्ठल-वाडीतील मनिप्रभा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या पत्नी मीनाक्षी चौधरी या शिवाजी नगरातील इंदिराबाई पाटणकर प्रायमरी स्कूलमध्ये नोकरीला होत्या.मंगळवारी सकाळी अष्टमीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण चौधरी कुटुंबकारने (एमएच 19, डीव्ही 8032)चोपड्याला गेले होते. रात्री 10वाजता ते चोपड्यातून जळगावात येत होते. रात्री 10.30 वाजता विदगाव तापी पुलावर समोरून आलेल्या पिवळ्या रंगाच्या वाळूने ओव्हरलोड भरलेल्या डंपरने (क्र.एमएच 19, सीडब्ल्यू 5180)कारला धडक दिली. यात डंपरचे दोन्ही चाक निखळून गेले आणि कारचा चुराडा झाला. मृत मीनाक्षी यांचे वडील पांडुरंग चौधरी यांच्या तक्रारीवरून डंपर चालकाविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डंपरचा स्टिअरिंग रॉड तुटला
रस्त्यावर रोज 30 ते 40 वाळूचे डंपर सुसाट वेगाने धावत असतात.डंपरच्या वेगामुळेच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. डंपर भरधाव वेगाने येत असताना पुलावरील जॉइंटच्या उंचवट्यावर आदळला. आदळल्याने वाळूने भरलेल्या डंपरचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची माहिती रात्री अपघात पाहिलेल्या ग्रामस्थांमधून समोर आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.