
गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात जे विमानाचे सर्व क्रू मेम्बर्स गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात उरण मतदार संघातील न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश असल्याची दु:खद बातमी हाती आली आहे . कालच न्हावा गा
.
न्हावा गावातील टी एस रहेमान शाळेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मैथिलीने अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. घरची स्थिती एवढी पण चांगली नव्हती तरीही हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले आणि दोन वर्षा पूर्वी तीने एव्हिएशन चे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात कामाला लागली होती. न्हावा सारख्या ग्रामीण भागात राहून ती नेहमीच अपडाऊन करून आपली नोकरी सांभाळत होती. कालच ती लंडनला विमानात कर्मचारी म्हणून जायचे आहे म्हणून न्हावा येथून निघून गेली होती. न्हावा गावाचे माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे.
एवढा मोठा अपघात घडलेला असताना आणि त्यात न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश असल्याची बातमी उरण पनवेल तालुक्यात अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरलेली असताना देखील एकही राजकीय व्यक्ती मैथिलीच्या घरच्यांचे सांत्वनासाठी न्हावा गावात आज संध्याकाळ पर्यंत तरी फिरकला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.