
दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथील प्रगतशील शेतकरी तांबे यांचा मुलगा महेश तांबे याने नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन संघांत झालेल्या टी-२० सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी केली. रविवारी (२७ जुलै) झालेल्या सामन्यात फिनलंडचा अष्टपैलू क्रिकेटपट
.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हा सर्वांत वेगवान ‘फायपर’ ठरले. त्यामुळे २ बाद १०४ धावा अशा मजबूत अवस्थेत असलेला एस्टोनिया संघ १४१ धावांवर सर्व बाद झाला. १७ व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या महेश तांबे याने आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेतले. दुसऱ्या षटकात त्याने आणखी २ बळी आपल्या खात्यात जमा केले. या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत जलद (कमी चेंडूंत) पाच बळी घेण्याच्या विक्रमावर महेश तांबे याने नाव कोरले. आयसीसीच्या पूर्ण सदस्यीय संघांमध्ये सर्वांत जलद पाच बळी घेण्याचा विक्रम हा अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या नावावर आहे. त्याने ११ चेंडूंत अशी कामगिरी नोंदवली होती. अष्टपैलू महेश तांबे हा फिनलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो. आतापर्यंत त्याने २४ टी-२० सामने खेळले असून, फलंदाजीत १४० धावा, तर गोलंदाजीत २८ बळी घेतले आहेत.
दरम्यान, महेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण साध्वी प्रीतीसुधाजी विद्यालय, राहाता येथे, तर अकरावी व बारावी शिक्षण प्रवरा महाविद्यालय, लोणी, तर बी.एससी बिटेक शिक्षणही लोणी येथे झाले आहे. त्यानंतर एमएससी स्वीडन येथे, तर फिनलंड येथे कर्करोगावर पीएचडी केली आहे. आता सध्या ते फिनलंड येथेच स्थायिक आहेत. क्रिकेटची लहानपणापासून आवड असल्याने त्यात ते प्रवीण झाले असून, सध्या तो फिनलंड टीमकडून खेळतो. शेतकरी कुटुंबातील मुलाने हिमालयाला गवसणी घालणारी कामगिरी केल्यामुळे कौतुक होत आहे. फिनलंडकडून एस्टोनियाविरुद्ध गोलंदाजी करताना राहात्याचा महेश तांबे महेश तांबे
कमी चेंडूंत पाच बळी घेणारे गोलंदाज { महेश तांबे (फिनलंड)- ८ चेंडू { जुनैद अजीज {(बहरीन)- १० चेंडू, { राशिद खान (अफगाणिस्तान)- ११ चेंडू { मुअज्जम बैग (मलावी)- ११ चेंडू, { खिजर हयात (मलेशिया)- ११ चेंडू
मुलाच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आमचे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. महेशला अनेक अडचणी आल्या, परंतु त्याने सर्व अडचणींवर मात करून शिक्षण केले. प्रदेशात नोकरीही मिळवली. त्याने केलेली कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असून, मुलाच्या कामगिरीचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचे वडील बाळासाहेब आणि आई प्रियवंदा तांबे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.