
Riteish Deshmukh On Maratha Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्यासोबतच महाराष्ट्रभरातून मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ट्विट करत त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील फोर्ट परिसरात व विविध भागात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. काल जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळं आज शनिवारी 30 ऑगस्ट रोजीदेखील मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुख याने पोस्ट केली आहे.
रितेश याने पोस्ट करत म्हटलं आहे की,
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र, असं रितेशने म्हटलं आहे.
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो… pic.twitter.com/1lIELovdJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 29, 2025
आंदोलकांची खाण्याची आबाळ
जरांगेंच्या समर्थनासाठी मराठा आंदोलक आझाद मैदानात आलेत. मात्र आझाद मैदानाजवळील सर्व दुकानं बंद असल्यानं या आंदोलकांचे खाण्याचे हाल झाले..अशावेळी मुंबई, पुणे आणि नाशिकमधून आलेल्या आंदोलकांनीच इथं आलेल्या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली..
जरांगेंचं उपोषण आणखी किती दिवस लांबणार?
मुंबईतलं आंदोलन लांबवण्याची रणनिती जरांगेंची असल्याची माहिती आता बाहेर येऊ लागलीय. आठ तासांसाठी मुंबईत आलेल्या जरांगेंना मुंबईत आठ दिवस मुक्काम ठोकायचा आहे. आंदोलनाचे आठ टप्पे असून आता आंदोलनाचा पहिला टप्पाच सुरु झाल्याचं जरांगेंनी सांगितलंय. बुधवारी आणि गुरुवारी आणखी मराठा आंदोलक मुंबईत येतील अशी माहिती जरांगेंनी दिलीये. जरांगे आझाद मैदानातील आंदोलन लांबवण्याच्या मानसिकतेत असल्यानं सरकारवर दबाव वाढलाय.
FAQ
1. मराठा आरक्षण आंदोलनाची मागणी काय आहे?
मराठा समाजाला ओबीसी (इतर मागासवर्ग) कोट्यात समाविष्ट करून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची मुख्य मागणी आहे.
2. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन का सुरू केले आहे?
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला गती देण्यासाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२५ पासून मुंबईतील आझाद मैदानात अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे. त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे.
3. मुंबईतील आंदोलनाला किती कालावधीची परवानगी मिळाली आहे?
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शांतिपूर्ण आंदोलनाची परवानगी दिली होती. तथापि, ३० ऑगस्ट रोजीही आंदोलन सुरू ठेवण्यासाठी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.