
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात रायवरमजवळ गुरुवारी एक रस्ते अपघात झाला. एका खाजगी प्रवासी बस आणि डंपरमध्ये धडक झाली. धडक होताच बसला आग लागली. बसमधील 14 प्रवासी जिवंत जळाले. तर 23 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची बस तेलंगणातील निर्मल येथून नेल्लोरकडे जात होती. हा अपघात सकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास झाला. आगीवर सुमारे तीन तासांत नियंत्रण मिळवण्यात आले. अपघाताशी संबंधित 3 फोटो… बस अपघाताशी संबंधित मागील घटना… 25 डिसेंबर 2025: कर्नाटकात स्लीपर बसला आग, 6 जण जिवंत जळाले; 30 हून अधिक प्रवासी होते कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे स्लीपर बसला धडकेनंतर आग लागली. या अपघातात बसमधील 6 हून अधिक लोक जिवंत जळाले. मृतांमध्ये 4 महिला, एक लहान मूल आणि लॉरीच्या चालकाचा समावेश होता. रात्री 2.30 वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या लॉरीने दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या सीबर्ड ट्रान्सपोर्टच्या खासगी कंपनीच्या बसला धडक दिली. बसला तात्काळ आग लागली. त्यावेळी प्रवासी झोपलेले होते. यामुळे त्यांना स्वतःला वाचवण्याची संधी मिळाली नाही. 5 नोव्हेंबर 2025: राजस्थानमध्ये एसी बसला आग, 20 प्रवासी जिवंत जळाले; 15 लोक भाजले राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जैसलमेर-जोधपूर महामार्गावर एसी स्लीपर बसला आग लागली होती. या अपघातात 20 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. हा अपघात शॉर्ट सर्किटमुळेच झाला होता. बस नेहमीप्रमाणे दुपारी 3 वाजता जैसलमेरहून जोधपूरसाठी निघाली होती. सुमारे 20 किलोमीटर दूर रस्त्यात थईयात गावाजवळ अचानक बसच्या मागील भागातून धूर निघू लागला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



