digital products downloads

‘आंबट शौकीनां’ना सरकारचा दणका, Ullu, ALTTसह 25 ओटीटी अ‍ॅप्सवर बंदी, पाहा संपूर्ण यादी

‘आंबट शौकीनां’ना सरकारचा दणका, Ullu, ALTTसह 25 ओटीटी अ‍ॅप्सवर बंदी, पाहा संपूर्ण यादी

Government Ban 25 OTT Apps : मोदी सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील आणि अनुचित कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. आता त्याच धर्तीवर आणखी 25 ओटीटी अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सवर कारवाई करत त्यांना ब्लॉक केले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाई माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत केली आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स सातत्याने अश्लील, अनैतिक, महिलांचा अपमान करणारा आणि भारतीय संस्कृतीविरोधी कंटेंट प्रसारित करत होते. यामुळे समाजात विकृती पसरवली जात होती आणि यावर अंकुश आणणे आवश्यक होते यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

या 25 अॅप्सवर बंदी

सरकारने बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये ALTT, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul App, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix आणि Triflicks या अॅप्सचा समावेश आहे.

या सर्व ओटीटी प्लॅटफोर्मवर आयटी कायद्याच्या कलम 67 आणि कलम 67 A आणि कलम 294 च्या महिलांच्या अश्लील प्रतिनिधित्व प्रतिबंधक कायद्याचे कलम 4 चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

काय परिणाम होणार?

सरकारने या 25 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता या अ‍ॅप्समधून मिळणारा असभ्य कंटेंट थांबेल. महिला व अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या मानसिक परिणामांना आळा बसणार आहे. भारतीय संस्कृती आणि नैतिकतेच्या चौकटीत कंटेंट तयार करण्यासाठी निर्मात्यांवर दबाव येईल. तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, जो कोणी ओटीटी प्लॅटफॉर्म भारतातील कायदे आणि समाजिक मर्यादा पाळत नाही त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. ह्या कारवाईमुळे ओटीटी जगतात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

याआधी देखील सरकारने 2024 मध्ये 17 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. त्यामुळे जर आता यापुढे ओटीटीवर अश्लील गोष्टी अढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. ओटीटीच्या नावाखाली जर विकृत, अश्लील किंवा महि्लांचा अपमान करणारा कंटेंट दाखवला तर त्यांच्यावर कलम 69A अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp