
Virar News : आईच्या हातातून 7 महिन्यांचे बाळ 21 मजल्यावरून खाली पडले आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही दुर्घटना विरारमध्ये घडली आहे. या घटेमुळे एकच खळबळ उाडली. ही संपूर्ण घटना कशी घडली? नेमकं काय घडलं हे माहित पाडल्यावर थरकाप उडत आहे.
विरार मध्ये सात महिन्याचा बाळाचा 21 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पश्चिमेच्या जॉयविले या उच्चभृ रहिवाशी संकुलात ही दुर्घटना घडली. 21 व्या मजल्यावरील 2104 या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दांपत्य राहतात. त्यांंना 7 महिन्यांचे बाळ होते.
बुधवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. मात्र, खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ 21 व्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे सदाने दांपत्याला 7 वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला 7 महिने पूर्ण झाले होते. बाळ गेल्यामुळे सदाने दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती यामुळे ही दुर्घटना घडली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास बोळींज पोलीस करीत आहेत.
दरम्यान, जॉयविले ही अलिशान आणि अत्यंत महागडी सोयटी आहेत. या सोसायटीत अनेक फ्लॅट आहेत. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
उकळत्या पाण्यात पडून दीड वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. विरारमध्ये ही दुर्घटना घडलीये. अवनी सोनावणे असं या मुलीचं नाव. पूर्व कोपरीमधल्या नित्यानंद छाया इमारतीमध्ये अवनी राहयची. तिच्या आईनं आंघोळीसाठी एका टबमध्ये उकळतं पाणी काढून ठेवलं होतं. तेवढ्यात कचऱ्याची गाडी आल्यामुळे ती कचरा टाकायला गेली. त्यावेळी अवनी घरातच खेळत होती. खेळता-खेळता अवनी टबाजवळ गेली आणि पाण्यात पडली. तिला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.