
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आम्हीदेखील मराठा समाजाचे असल्याने त्यांच्या आंदोलनाचे समर्थकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर आम्ही देश अन् महाराष्ट्र चालवत आहोत. मराठी माणूस म्हंटलो की छत्रपती शिवरा
.
प्रसाद लाड पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला सांगितले की प्रत्येक स्त्रीला आपल्या आईच्या नजरेतून पाहा. म्हणून त्यांच नजरेतून आम्ही मनोज जरांगे पाटील यांना सांगितले की तुम्ही ज्या आईवरून शिव्या दिल्या त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही जर दिलगिरी व्यक्त केली नाही तर आम्हालाही त्याच भाषेत व्यक्त व्हावे लागेल. त्यांनी लगेच या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यामुळे विषय संपला.
कार्यकर्त्यांनी बॅनर लावले
प्रसाद लाड म्हणाले की, महाराष्ट्राला संस्कृती आहे, परंपरा आहे, लोक इतिहास लक्षात ठेवतात, शिव्या शाप लक्षात ठेवत नाहीत याचे आठवन करुण देण्याचे काम आम्ही बॅनरच्या माध्यमातून केले आहे. बॅनर बऱ्याच कार्यकर्त्यांनी लावले आणि काढले.पण बॅनर काढणे हा मनपाचा विषय आहे. बॅनर लावले हे मान्य आहे.
समाजाने फडणवीसांचे आभार मानावे
प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत काही इतका मोठा माणूस नाही की त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही द्यावे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कुणीही विरोध केलेला नाही. उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलन करु नका हे सांगितले आहे. त्याच्याविरोधात जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने जरांगे पाटील यांना 1 दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांचे आपण आभार मानले पाहिजे की आमच्या समाजाच्या आंदोलनासाठी त्यांनी परवानगी दिली आहे. 5 हजार लोक तिथे येऊ शकतात असा त्यात उल्लेख आहे.
चर्चेतून मार्ग काढावा
प्रसाद लाड म्हणाले की, आरक्षणाचा विषय हा आंदोलनामुळे संपणार नाही तो चर्चेने सुटणार आहे. जर चर्चेने विषय सोडवायचे असेल तर उपसमिती बनवली आहे. त्यांचे प्रमुख विखे पाटील असून उदय सामंत त्या समितीमध्ये आहेत. या समितीच्या माध्यमातून चर्चा काढून मार्ग काढता येऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की एकनाथ शिंदे यांनी काही जीआर दिला होता असे त्याचे म्हणणे आहे. पण त्यावर चर्चेतून मार्ग काढावा. आम्ही सर्व जण आणि सरकार आरक्षणाच्या मुद्यावर तुमच्यासोबत आहोत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.