
Nagpur-Pune Vande Bharat Express : नागपूर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आज (10 ऑगस्ट) पासून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूरू येथून ऑनलाईन पद्धतीने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करणार आहेत. ही महाराष्ट्रातील 12 वी वंदे भारत एक्सप्रेस असून पुणे-नागपूर मार्गावर धावणारी ही आतापर्यंतची सर्वात जलद एक्सप्रेस ठरणार आहे.
ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर आणि पुणे दरम्यान धावेल. विशेष म्हणजे वर्धा–मनमाड दरम्यानच्या भागाला ही पहिलीच वंदे भारत सेवा मिळत आहे. सरासरी 73 किमी प्रतितास वेगाने ही वंदे भारत ट्रेन धावेल आणि प्रवाशांना कमी वेळात लांबचा प्रवास पूर्ण करता येणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा ट्रेन क्रमांक 26101 (पुणे–अजनी) आठवड्यातून 6 दिवस (मंगळवार वगळता) सकाळी 6:25 वाजता पुणे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6:25 वाजता अजनी येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 26102 (अजनी–पुणे) आठवड्यातून 6 दिवस (सोमवार वगळता) सकाळी 9:50 वाजता अजनी स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9:50 वाजता पुण्यामध्ये पोहोचेल.
कोणत्या ठिकाणी थांबणार?
ही वंदे भारत एक्सप्रेस दौंड कॉर्ड लाईन, नगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 8 कोचेस असतील. 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि 7 चेअर कार. एकूण 530 प्रवाशांसाठी या ट्रेनमध्ये आसनव्यवस्था आहे.
एक्झिक्युटिव्ह चेअर कार: 52 आसने. चेअर कार प्रत्येकी 78 आसने. 5 कोचेस. लोको पायलटला जोडलेले चेअर कार प्रत्येकी 44 आसने 2 कोचेस. या गाडीत आधुनिक सुविधा, वेगवान प्रवास आणि आरामदायी आसनव्यवस्था मिळणार आहे. विशेषतः पुणे–नागपूर प्रवासासाठी ही गाडी प्रवाशांचा वेळ वाचवेल आणि महाराष्ट्राच्या रेल्वे सेवेत एक नवा टप्पा गाठेल.
FAQ
1. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ कधी होणार आहे?
ही एक्सप्रेस 10 ऑगस्ट 2025 पासून धावणार आहे.
2. वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावेल?
ही गाडी नागपूर (अजनी) आणि पुणे दरम्यान धावेल, ज्यामुळे वर्धा-मनमाड भागाला पहिली वंदे भारत सेवा मिळेल.
3. ही वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातील कितवी आहे?
ही महाराष्ट्रातील 12 वी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.