digital products downloads

आजपासून बाधा दूर, इराणने भारताला दिला रस्ता: होर्मुझमधून गॅस घेऊन येणार 2 जहाजे, अमेरिकेचे इंधन भरणारे विमान कोसळले, 6 जवानांचा मृत्यू

आजपासून बाधा दूर, इराणने भारताला दिला रस्ता:  होर्मुझमधून गॅस घेऊन येणार 2 जहाजे, अमेरिकेचे इंधन भरणारे विमान कोसळले, 6 जवानांचा मृत्यू

  • Marathi News
  • National
  • Obstacles Removed From Today, Iran Gives Way To India, 2 Ships Will Bring Gas Through Hormuz, US Refueling Plane Crashes, 6 Soldiers Killed

नवी दिल्ली59 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

घरगुती गॅसच्या टंचाईमध्ये एक दिलासादायक बातमी आहे. न्यूज एजन्सी ‘रॉयटर्स’नुसार, इराणने एलपीजीने भरलेल्या दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या खाडीतून जाण्याची परवानगी दिली आहे. तर सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन निघालेले एक टँकर शनिवारी भारतात पोहोचणार आहे. एका टँकरमध्ये १० हजार ते ४५ हजार मेट्रिक टन एलपीजी येते. इतक्या गॅसमध्ये १० लाख ते ३१ लाख घरगुती गॅस सिलिंडर भरले जाऊ शकतात.

यापूर्वी, नवी दिल्लीतील इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांना जेव्हा विचारण्यात आले की, इराण भारतीय जहाजांना होर्मुझमधून सुरक्षित बाहेर पडण्याचा रस्ता देईल का? तेव्हा ते म्हणाले, “हो, भारत आमचा मित्र आहे. त्या क्षेत्रात आमचे हितसंबंध एकच आहेत. आम्हाला आशा आहे की युद्ध संपल्यानंतर भारत सरकार इराणच्या पुनर्बांधणीत आम्हाला मदत करेल.” दरम्यान, होर्मुजमध्ये भारताचे २४ हजार ६७७ खलाशी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या इराणी समकक्षांशी चार वेळा चर्चा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पजेश्कियान यांच्याशी चर्चा केली होती. भारत आपल्या गरजेच्या ६०% एलपीजी आयात करतो. याचा मोठा हिस्सा होर्मुजमधूनच येतो, जो इराणने बंद केला. तसेच, अमेरिकेने भारतापाठोपाठ सर्व देशांना ११ एप्रिलपर्यंत रशियाकडून तेल खरेदीसाठी सवलत दिली.

निफ्टीबाबत सावधान..

बाजार ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये आहे. जोपर्यंत निफ्टी २३,५०० च्या वर टिकत नाही, तोपर्यंत सावधगिरी बाळगा. निफ्टीसाठी आता २३,००० ची मनोवैज्ञानिक पातळी शेवटची आशा आहे. सोमवारी बाजार याखाली उघडला तर घसरण अधिक तीव्र होईल.

२००८ नंतर पहिल्यांदाच असे…

निफ्टीआयटी इंडेक्स सलग ८ व्या आठवड्यात लालवर बंद होत आहे. २००८ आणि २००१ नंतरचा हा सर्वात वाईट काळ.

मोज्तबा यांच्यावर ८३ कोटींचे बक्षीस…

अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते, त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी जखमी आहेत. अमेरिकी संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले, मोज्तबा यांचा चेहरा विद्रूप झाला आहे. दरम्यान, अमेरिकन परराष्ट्र विभागाने मोज्तबा व इराणी नेते अली लारीजानी यांची माहिती देणाऱ्यास १ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

२२ कोटींनी १३ दिवसांत बुकिंग केले

देशात सध्या सुमारे ३३ कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यापैकी २१.७ कोटींनी १३ दिवसांत बुकिंग केले आहे. सिलिंडर बुकिंगची संख्या सामान्य दिवसांच्या तुलनेत ४००% ते ५००% पर्यंत वाढली आहे.

गॅस: रोज ७५ लाख सिलिंडर बुकिंग, आधी ५५ लाख व्हायचे

देशात स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई नाही. घरांपर्यंत एलपीजीचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहील, अशी माहिती शुक्रवारी पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉइंट सेक्रेटरी सुजाता शर्मा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या युद्धापूर्वी देशात गॅस सिलिंडरचे प्रतिदिन सरासरी बुकिंग ५५.७ लाख होते, जे आता ७५.७ लाख झाले आहे. हे पॅनिक बुकिंगचे संकेत आहेत. देशभरात २५ हजार एलपीजी वितरक आहेत, मात्र कुणाकडेही ‘ड्राय आऊट’ची माहिती नाही. तरीही मागणीनुसार घरगुती एलपीजीचे उत्पादन ५ मार्चच्या तुलनेत ३०% वाढवण्यात आले आहे. सुदीप शाह, उपाध्यक्ष, एसबीआय सिक्युरिटीज

सेन्सेक्स १४७१ अंकांनी गडगडला, निफ्टीलाही फटका

मुंबई | शेअर बाजारात शुक्रवारीही घसरण झाली. सेन्सेक्स १,४७१ अंक (-१.९३%) घसरून ७४,५६३ वर, तर बेंचमार्क इंडेक्स निफ्टी २.०६% घसरून २३,१५१ वर बंद झाला. हा १०० आठवड्यांच्या (जून २०२२ नंतर) नीचांक आहे. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरु झाल्यापासून सेन्सेक्सने ६,७२३.२७ अंक आणि गुंतवणूकदारांनी सुमारे ३३ लाख कोटी रुपये गमावले आहेत. शुक्रवार,२७ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स ८१,२८७.१९ अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये गेल्या २० महिन्यात प्रथमच ८.२७ टक्के एवढी घसरण झाली आहे. एकट्या मार्च महिन्यात आतापर्यंत सुमारे ४.५२ लाख कोटी रुपयांचे समभाग विकून परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला आहे.

बाजारात घबराट… १५ दिवसांत ८% घसरगुंडी, कोविडनंतर मार्चमधील सर्वात मोठी घसरण

इस्रायली-अमेरिकन हल्ल्यांदरम्यान शुक्रवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजेश्कियान तेहरानच्या रस्त्यांवर फिरले. ते ‘कुद्स डे’च्या रॅलीत सहभागी झाले होते. पॅलेस्टिनी लोकांशी एकता दर्शवण्यासाठी आणि इस्रायली कब्जाचा निषेध करण्यासाठी ही रॅली दरवर्षी काढली जाते. विशेष म्हणजे रॅलीपासून काही अंतरावरच स्फोट झाले, तरीही रॅली थांबली नाही.

तेहरानच्या रस्त्यांवर फिरले राष्ट्राध्यक्ष पजेश्कियान

इराकच्या पश्चिम भागात अमेरिकेचे एक केसी-१३५ रिफ्युलिंग विमान कोसळले. यातील सर्व ६ जवानांचा मृत्यू झाला. आणखी एक विमान खराब झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, हे विमान शत्रूच्या गोळीबारामुळे कोसळलेले नाही.

युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेची ४ विमाने आणि सुमारे ११ ड्रोन्स कोसळले आहेत. तर इस्रायलचे ५ हून अधिक हेरॉन/हर्मीस ड्रोन्स इराणी सैन्याने पाडले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp