
Beed Crime News : बीडमधील जंगलराज कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्यानंतर बीडमधील गुंडाराज राज्यासमोर आलं. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा बीडमधील गुन्हेगारीच्या समोर येत आहेत. त्यात आता माजलगावमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्याची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा आणखी एका हत्येच्या घटनेनं हादरून गेला आहे. बीडच्या माजलगाव शहरात भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्रांनी वार करत आगे यांची हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे हे भाजपचे लोकसभा विस्तारक होते. नारायण फपाळ याने आगे यांची हत्या केली आहे. हत्येनंतर नारायण फपाळ हा आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.
बाबासाहेब आगे यांची हत्या कशी झाली?
बाबासाहेब आगे हे भाजप लोकसभा विस्तारक आहेत. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत. नारायण फपाळकडून धारदार शस्त्राने बाबासाहेब आगे यांची हत्या झाली. बाबासाहेब आगे भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊतांच्या भेटीला जात असताना त्यांची हत्या करण्यात आली.
माजलगाव शहरातील वर्दळीच्या स्वामी समर्थ मंदिराजवळ ही हत्या झाली. हत्येनंतर नारायण फपाळ स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत हत्येची कबुली त्याने दिली. आर्थिक देवाण-घेवाणीतून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
पुण्यातील उद्योजकाचा बिहारमध्ये खून
पुण्यातील उद्योजकाची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे. उद्योजक लक्ष्मण शिंदे यांची बिहारमध्ये हत्या झाली आहे. व्यवसायानिमित्त बिहारमध्ये गेले असताना ही घटना घडली. बिहारमध्ये लक्ष्मण शिंदे यांचा गुंडांकडून खून करण्यात आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.