
9 Carat Gold Jewellery: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. एक तोळा सोनं लाखांच्या घरात पोहोचले आहे. अशावेळी ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नाही म्हटलं तरी लग्नसमारंभाच्या कार्यात सोन्याचे दागिने देण्याची प्रथा आहे. त्यामुळं हल्ली ग्राहकांचा कल कमी कॅरेट असलेल्या स्वस्त दागिन्यांकडे वाढतोय. त्याचमुळं भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस)ने आता नऊ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्गिंकची अधिकृत मान्यता दिली आहे.
ग्राहकांना आता 9 कॅरेट सोन्याचे दागिनेही खरेदी करता येणार आहे. नऊ कॅरेट सोन्याचे दागिने अधिकृतरित्या प्रमाणित केले जाणार आहेत. वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अधिक परवडणारे पर्याय उपलब्ध होणार आहेत. अनेकजण सोनं घ्यायचं म्हटलं की 22 किंवा 23 कॅरेटचे दागिने घेतात. मात्र हल्ली दर वाढल्याने 18 कॅरेट सोन्याचे दागिनेही घेतात.
गेल्या काही वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी लोक 22 कॅरेटनंतर 18 कॅरेट 14 कॅरेटलादेखील पसंती देत आहेत. त्याचबरोबर आता नऊ कॅरेट दागिन्यांचाही ट्रेंड वाढत आहे. बीएसआय दुरुस्ती क्रमांक 2नुसार, जुलै 2025 पासून 9 कॅरेट सोने अनिवार्य हॉलमार्किंग योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
नऊ कॅरेटचा पर्याय ग्राहकांसाठी किफायतशीर आणि परवडणारा आहे. तसंच, बजेट फ्रेंडलीदेखील आहे. हॉल मार्किंगमुळं कॅरेट काहीही असले तरी ग्राहकांना सोन्याची शुद्धता हमीसह कळणार आहे. परवडणारी किंमत आणि सोनं यामुळं 9 कॅरेट सोन्याची मागणी वाढते आहे.
9 कॅरेटमध्ये किती शुद्ध सोनं असत?
9 कॅरेटमध्ये ज्यामध्ये 37.5% शुद्ध सोने असते आणि उर्वरित चांदी आणि तांबे यांचे मिश्रण असते. उदा. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 100 ग्रॅम 1 लाख रुपये असेल, तर 9 कॅरेटची किंमत प्रति ग्रॅम सुमारे 3,750 ते 3,800 रुपये असेल.
आजचा सोन्याचा भाव काय?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. मात्र आज सोनं किंचित घसरलं आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,01,350 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 92,900रुपयांवर स्थिरावला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 76,010 रुपयांवर स्थिरावले आहे.
FAQ
1) हॉलमार्किंग म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय?
हॉलमार्किंग ही भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे सोन्याच्या शुद्धतेची प्रमाणित हमी आहे. हॉलमार्क लोगो, कॅरेट मूल्य, आणि ज्वेलरचा आयडी यामुळे ग्राहकांना सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता याची खात्री मिळते. यामुळे फसवणुकीला आळा बसतो.
2) सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे का?
सोन्याच्या किमती जागतिक बाजारपेठ, मागणी-पुरवठा, आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतात. सध्या किमतीत किंचित घसरण दिसत असली, तरी भविष्यातील किमतींबाबत अंदाज बांधणे कठीण आहे.
3) 9 कॅरेट सोन्यामध्ये किती शुद्ध सोने असते?
9 कॅरेट सोन्यामध्ये 37.5% शुद्ध सोने असते, तर उर्वरित 62.5% चांदी, तांबे किंवा इतर धातूंचे मिश्रण असते. उदा., 10 ग्रॅमच्या 9 कॅरेट दागिन्यात 3.75 ग्रॅम शुद्ध सोने असते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.