
Aaditya Thackeray Vs Eknath Shinde: औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे हे राजकारणी असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे. त्यांच्या या टिकेवर शिवसेनेनंही पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले त्यांनी म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला. त्याच्यावर बोलणारे हे कोण? तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून! जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा! स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत! अश्या निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये,’ अशी जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला… त्याच्यावर बोलणारे हे कोण?
तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 18, 2025
तर आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवर शिवसेनेनेदेखील प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी करुन औरंगजेबी विचारांचा हात धरणारे आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. पुढे म्हटलं आहे की, सत्तेसाठी काँग्रेसी गुळाला चिकटलेले हे मुंगळे बाळासाहेबांनी वेळीच चिरडून टाकले असते. ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाठा आणि आदूबाळ हिंदुत्वाच्या विरोधात कट रचत आहेत, त्यांच्याच काळात औरंग्याच्या कबरीला कायदेशीर संरक्षण दिले होते. या दोघांच्यात थोडीही जनाची नाही तर मनाची शिल्लक असेल तर त्यांनी काँग्रेसचा निषेध करण्याची हिंमत दाखवावी,’ असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी करुन औरंगजेबी विचारांचा हात धरणारे आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ आहेत.
सत्तेसाठी काँग्रेसी गुळाला चिकटलेले हे मुंगळे बाळासाहेबांनी वेळीच चिरडून टाकले असते.
ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाठा आणि आदूबाळ हिंदुत्वाच्या विरोधात कट रचत आहेत,… https://t.co/xuL4khfXl9
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 18, 2025
‘छत्रपती शिवाजी महाराज हे नातेसंबंध न पाहता केवळ शौर्य आणि नेतृत्वगुणाला महत्त्व देणारे होते. त्यांने नाव घेणारे आजचे महाराष्ट्र द्रोही मात्र नकळत्या वयातल्या लेकराला मंत्री करतात. मग पोरगं खांद्यावर बसलं की एक पाय वर करतं आणि भूंकतंही,’ असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.