
Hospital Shocking Video: राज्याची आरोग्य व्यवस्था उत्तम असावी, यासाठी सरकार दक्ष आहे. पण राज्यातल्या ग्रामीण भागातलं दृश्य नुसतं विपरित नाही तर भयाण आहे.. अनेकदा डॉक्टर नाही, कर्मचारी नाही, सामग्री नाही अशी ओरड असतेच पण परभणीतला प्रकार पाहून तुम्ही डोक्याला हात लावलाय. एका व्हिडिओनं आरोग्य व्यवस्थेचं वास्तव समोर आणलंय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पशुरूग्णालय असेल असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. कारण हे माणसांसाठीचं रूग्णालय आहे. फक्त कब्जा कुत्र्यांनी केलाय इतकंच. हे कुत्रे थेट रूग्णांच्या खाटांवर चढतात, बसतात. त्यांचा हा मुक्तसंचार पाहून आपल्याला जरी धक्का बसला असला तरी तिथल्या आरोग्य यंत्रणेला त्याच काहीही सोयरंसुतक नाही. परभणीच्या जिंतूरमधल्या ट्रॉमा केअर सेंटरमधला प्रकार आहे. या व्हिडिओनं रूग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणलाय.
महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात साप आढळला होता. तेव्हाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.पण कुंभकर्णासारखं गाढ झोपी गेलेल्या रूग्णालय प्रशासनाला जाग येईल, तर शप्पथ.. बरं, हा मतदारसंघ आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा. त्याच मतदारसंघात रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मग इतर भागातली परिस्थिती काय असेल याचा विचार न केलेला बरा.
आधी साप आता कुत्रे उद्या आणखी कुणी. अशी रूग्ण सोडून सर्वांची व्यवस्था, सोय तिथल्या डॉक्टरांनी आणि कर्मचा-यांनी केलीय. हा व्हिडिओही व्हायरल झालाय.आणखी होईल.. पण रूग्णालय प्रशासन याकडे लक्ष देणार का?. राज्याचे आरोग्यमंत्री संबंधितांवर कारवाई करणार का? की आणखी वन्यप्राणी पाहण्याचा योग रुग्णांच्या येतो, हे पाहणं महत्त्वाचं. काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या रूग्णालयात उंदरांचा सुळसुळाट असलेला व्हिडिओ आपण पाहिला होता. त्यामुळे रूग्णालयांच्या या स्थितीकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे.
FAQ
प्रश्न: परभणीच्या जिंतूर ट्रॉमा केअर सेंटरमधील व्हायरल व्हिडिओत कोणता धक्कादायक प्रकार समोर आला आहे?
उत्तर: परभणीच्या जिंतूर ट्रॉमा केअर सेंटरमधील एक व्हायरल व्हिडिओ दाखवतो की, रुग्णालयात कुत्रे थेट रुग्णांच्या खाटांवर चढतात आणि बसतात. यापूर्वी याच रुग्णालयात साप आढळल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या घटनांनी रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि अस्वच्छतेचे वास्तव चव्हाट्यावर आणले आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रश्न: जिंतूर ट्रॉमा केअर सेंटरच्या या समस्यांबाबत प्रशासनाची काय भूमिका आहे?
उत्तर: व्हायरल व्हिडिओनुसार, जिंतूर ट्रॉमा केअर सेंटरमधील कुत्रे आणि यापूर्वीच्या सापाच्या घटनेकडे रुग्णालय प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाला या गंभीर समस्यांची जाणीव असूनही कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही. हा मतदारसंघ आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा असूनही, रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका होत आहे.
प्रश्न: या व्हिडिओनंतर रुग्णालयातील परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी काय अपेक्षित आहे?
उत्तर: जिंतूर ट्रॉमा केअर सेंटरमधील कुत्रे आणि साप यांसारख्या घटनांनी रुग्णालयातील अस्वच्छता आणि ढिसाळ कारभार उघड झाला आहे. यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकारी यांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. रुग्णालयात स्वच्छता, कर्मचारी उपस्थिती आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे गरजेचे आहे. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना आणि नियमित तपासणी आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.