
केंद्र सरकार असो की, राज्य सरकार ते संविधानाला मानत नाही. संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातो आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी आज केला. आज डॉ.बाबासाहेब आंबडकर यांच्या जयंतीनिमित्त
.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि लोकशाही निर्माण केली आहे. संविधान आपण वाचवले पाहिजे. जेव्हा सत्ताधाऱ्यांचे विचार हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, जेव्हा देशाचे गृहमंत्री म्हणतात की, संविधान संविधान संविधान हे अभी फॅशन बन गया है, जर संविधान आणि बाबासाहेबांचा असा तिरस्कार केला जात असेल, तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की, लोकशाहीची चळवळ जिवंत ठेवली पाहिजे.
भाजपने जेव्हा 400 पारचा नारा दिला होता, तेव्हा कोणाला माहिती होते की, संविधान बदलण्यासाठी त्यांनी हा नारा दिला होता, पण त्यांचे पितळ उघडे पडले, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली. बाबासाहेबांना मानणारे जोपर्यंत आहेत, तो पर्यंत संविधानाला आम्ही हात काय बोट पण लावू देणार नाही. बाबासाहेब हे केवळ आपल्या देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी होते ही बाब विसरता येणार नाही, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
जिथे हिटलरशाही आहे अमेरिका, रशिया किंवा आपला देश. सगळीकडे हिटलरशाही चालू आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. संविधानाने दिलेले अधिकार हिसाकावून घेतले जात आहेत. आचार्य अत्रेचा काळ होता, जिथे प्रत्येक राज्यकर्त्यांचा बाबतीत ते विनोद करायचे. त्यावेळेस त्यांच्यावरती या थराला जाऊन कधी कोणी काहीही केले नाही. पण आता हे व्यासपीठ राहिलेले नाही, जे व्यासपीठ बाबासाहेबांनी दिले ते राहिलेच नाही, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
जेव्हा तीन-तीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणूक होत नाहीत त्यातूनच संविधानाचा अपमान होतो. केंद्र सरकार असो की, राज्य सरकार ते संविधानाला मानत नाही. संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातो आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.
प्रणिती शिंदे यांनी यावेळी शेतकरी कर्जमाफी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देऊ म्हटले होते. आता ते म्हणत आहेत सगळी वचने दिली ती पूर्ण केली जात नाहीत. ही फसवणूक आहे, असे त्या म्हणाल्या. बीडमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला. या संदर्भातला व्हिडीओ समोर आला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे सगळे माहिती होते तरीही ते हसत खेळत होते. या सरकारला आतला आवाजच उरला नाही. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिस कोठडीत झाली आहे. तरीही सरकारने काही केले नाही, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी सरकारवर केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.