
आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी 1 हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता आपले सरकार पोर्टलवरील शासकीय सेवा
.
या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार पोर्टलच्या तक्रारी आणि त्यावर होत असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने चर्चा झाली. राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत 1027 सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी 527 सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा पुरवण्यासाठी आणि सरकारी कार्यालयातील येणाऱ्या अडचणींच्या तक्रारी करण्यासाठी सरकारने आपले सरकार पोर्टल व मोबाईल अॅप ही सेवा सुरू केली आहे.
या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन, अॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या 138 इंटिग्रेटेड सेवा 31 मे 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिल्या आहेत. तसेच उर्वरित 306 अधिसूचित सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात, असेही यावेळी निर्देश देण्यात आले आहेत.
‘आपले सरकार’ हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि कार्यक्षम पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देणे आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक जन्म, मृत्यू, उत्पन्न आदी प्रमाणपत्रे, परवाने व अन्य अनेक सेवा घरबसल्या अर्ज करून मिळवू शकतात. तसेच, यात एक तक्रार निवारण यंत्रणाही समाविष्ट आहे, जिच्या साहाय्याने नागरिक त्यांच्या समस्या व तक्रारी संबंधित सरकारी विभागांपर्यंत पोहोचवू शकतात. ‘आपले सरकार’ पोर्टल आणि मोबाईल अॅपद्वारे या सेवा उपलब्ध असून, यामुळे नागरिकांची सरकारी कार्यालयांना वारंवार भेट देण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होते आणि प्रशासनाशी थेट संपर्क सुलभ होतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.