digital products downloads

‘आपल्याला निर्णय घ्यावा लागेल…’, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना स्षष्टच सांगितलं, ‘पुढच्या एक दोन दिवसांत…’

‘आपल्याला निर्णय घ्यावा लागेल…’, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना स्षष्टच सांगितलं, ‘पुढच्या एक दोन दिवसांत…’

Sanjay Raut on Uddhav Thackeray: राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, शरद पवार इच्छुक असल्याचं त्यांनी मला स्वत: सांगितल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना केलेल्या विनंतीची माहिती दिली. उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेत रिक्त होणाऱ्या जागेवर जाण्यासाठी आपण आग्रह केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपल्याला निर्णय घ्यावा लागेल असं मी उद्धव ठाकरेंशी बोललो असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एक दोन दिवसांत यासंदर्भातील मत सांगू असंही ते म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

विधानपरिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्यात उद्धव ठाकरेही असून, ते पुन्हा सभागृहात जाणार का? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “त्यांना आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की विधीमंडळात असणं गरजेचं आहे. ही माझी स्वत:ची भूमिका आहे. माझ्या इतर सहकाऱ्यांनीही असं वाटतं. त्यांनी विधीमंडळात असणं आमच्या संघटनात्मक विधीमंडळ बाबींसाठी महत्वाचं आहे”.

राज्यसभा निवडणुकीवर ते म्हणाले की, “महाविकास आघाडीला एक जागा मिळेल. तिघांची ताकद असून, बैठक घेत कोणाला पाठवायचं हे ठरवलं जाईल. दोन दिवसात निर्णय घ्यावा लागेल”. 

शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार

“शरद पवारांशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त करत राज्यसभेवर जाणार असं सांगितलं आहे. म्हणजे मी उमेदवार आहे ही भूमिका आपल्याकडे मांडली आहे. मी निवडणूक लढणार असं त्यांनी सांगितलं आहे. यावर आता महाविकास आघाडीत चर्चा होईल. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता अशी इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्यावर वेगळी चर्चा करायला हवी,” असं ते म्हणाले. 

 

काँग्रेसच्या एका गटाला शरद पवार भाजपात जातील असं वाटत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “शरद पवारांशी मी बोललो असून, ते राज्यसभा उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. शरद पवार भाजपासोबत जाणार नाहीत. मी त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता किंवा नेता नाही. पण मला जे शरद पवार माहिती आहेत त्या खात्रीने सांगतो ते कोणत्याही स्थितीत भाजपासोबत जाणार नाहीत. काँग्रेसने उगाच भीती बाळगू नये. आजही दिल्लीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या संवाद आणि संपर्कात आहेत. महाराष्ट्रापेक्षा दिल्लीचं काय म्हणणं आहे हे महत्त्वाचं आहे,” असं राऊत म्हणाले. 

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटीवर ते म्हणाले की, “तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारत का नाही? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तेच देतील. आमही हेरगिरी करत नाही. मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला या भेटीबद्दल समजतं. कोणी कोणाला भेटणं यावर बंधन नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण आहे. हे टोकाचं भांडण एकनाथ शिंदे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, विचारांशी बेईमानी केली म्हणून आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे”. 

‘शिवसेनेच्या आणि धनुष्यबाणाच्या चोरीतून हे नंदनवन उभं राहिलं’

“ज्याने मराठी माणूस, महाराष्ट्राशी बेईमानी केली त्यांच्याशी महाराष्ट्राच्या हितासाठी भांडण आहे. शिवसेनेच्या आणि धनुष्यबाणाच्या चोरीतून हे नंदनवन उभं राहिलं आहे,” अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे. 

‘आमचं भांडण कायम राहणार’

पुढे ते म्हणाले की, “कोणी कोणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं भांडण कायम राहणार. महाराष्ट्राच्या हितासाठी हे भांडण आम्ही उकरुन काढलं आहे. कोणीही यावं आणि बाळासाहेबांच्या विचारांवर थुकावं हे आम्हाला चालणार नाही. काय होतं ते पाहू. हे प्रश्न त्यांच्या (मनसेच्या) लोकांना विचारा. का भेटले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे”. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp