
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी अजित पवारांनी रोहित यांच्यावर केलेली टीका धुडकावून लावली आहे. आमच्या सगळ्या काकांना पुतण्यास दिसतो. दादांना गायीचा व्यवसाय चांगला जमायचा. माझी गाय 3 हजा
.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांचा चिमटा काढला होता. आपण पोस्टल मतांवर निवडून आलात. हे विसरू नका. भावकीने लक्ष घातले नसते तर तू निवडूनही आला नसतास, असे ते म्हणाले होते. आता रोहित यांचे वडील राजेंद्र पवार यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्यु्त्तर दिले आहे. ते बुधवारी बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, पवार घराण्यात आतापर्यंत सर्वच काकांनी आपल्या पुतण्याला मदत केली आहे. किंबहुना ती आमच्या घराण्याची परंपराच आहे. सुरुवातीच्या काळात अजित पवार निवडणूक लढले तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे अप्पासाहेबांनी त्यांना मदत केली.
नवख्या माणसाला किती मतदान पडते हे सर्वश्रूत आहे. पण त्यानंतर अजित पवारांनी तब्बल 35 वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व केले. काहीजण पोस्टल मतांवर निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते.
सगळ्या पवार काकांना पुतण्याच दिसतो
ते पुढे म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वडील माझा विचार करतील असे मला वाटले होते. पण आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. त्यामुळे माझ्याकडे दुर्लक्ष झाले. त्यांनी माझ्याजागी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली, पण त्यावेळी मला सांगितले गेले की, सर्वांनीच राजकारणात यायचे नसते. मला तो सल्ला पटला. मी शांत बसलो. त्यावेळी मला माहिती नव्हते की, संधी असे तेव्हा ती खेचून घ्यायची असते. मला कारखान्यावर संधी दिली गेली नाही. कदाचित माझ्या काकांना वाटले असेल की, हा कारखाने काढेल, जळगावला काढेल, मराठवाड्यात काढेल, बारामतीच्या आसपास काढेल. आत्ता मी इथे तुम्हाला एआय तंत्रज्ञानावर बोलण्यास उभा टाकलो आहे.
दादांना गायींचा व्यवसाय चांगला जमायचा
आमचा एक किस्सा अख्ख्या राज्याला माहिती आहे. एकदा आम्ही गाई आणायला गेलो होतो. तेव्हा अजितदादा केबिनमध्ये बसले व मागे गाईच्या शेपटाजवळ बसलो होतो. दादा पुढच्या केबिनमधून त्याच्या पुढच्या केबिनमध्ये गेला, पण आम्ही आहे तिथेच राहिलो. दादांना गायींचा व्यवसाय चांगला जमायचा. माझी गाय 3 हजाराला गेली की, त्याची गाय 9 हजाराला जायची, असेही राजेंद्र पवार यावेळी हसत – हसत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी संघटनावाल्यांना काही बोलणार नाही. ते त्यांचे काम करतात. पण शेतमालाचा भाव वाढेल असे मला वाटत नाही. कारण, लोक स्वस्तवाल्यांना जास्त मतदान करतात. सरकार आयुष्यात ठोस निर्णय घेऊ शकत नाही. पाणी जास्त दिले तर पुढल्या पिढीला जमिनी राहणार नाहीत. भविष्यात एआयचा प्रभाव एवढा असेल की, पुढच्या 8-10 वर्षांत मुलांना शाळेत शिकवायला शिक्षक नसतील. गाडी चालवायला ड्रायव्हर नसतील. 2040 मध्ये मेंदूही बदलला जाण्याची शक्यता आहे. माळेगाव मध्यवर्ती संशोधन केंद्राने 265 सारखी उसाची जात काढून टनाटनाने महाराष्ट्राचे साखर वाढवली. पण त्या पाडेगाव संशोधन केंद्राकडे बघायला कुणीही तयार नाही, असेही राजेंद्र पवार यावेळी बोलताना म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.