
प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात आमच्या सहा जणांची कोणतीही जमीन नाही. मी त्या आरोप करणाऱ्याला म्हटले तुला जर माझ्या 120 एकर जमिनीची माहिती मिळाली, तर सर्व जमीन तुला देऊन टाकते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी 120 एकर जमिनीच्या आरोपा
.
नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी सरकारकडून सर्वे होत आहे. मात्र, या विमानतळाला आसपासच्या गावांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी सर्वे करण्यासाठी गेलेल्या जिल्हा प्रशासनाचे पथक आणि ग्रामस्थांमध्ये कुंभारवळण येथे वाद होऊन पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी लाठी हल्ला केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सोमवारी सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळण गावाला भेट दिली. तेथील परिस्थिती आणि नागरिकांचे म्हणणे सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांना सांगितले. सरकारने पुरंदर विमानतळाचा प्रश्न संवेदनशील हाताळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. आंदोलकांवर दाखल गुन्ह्यासंदर्भात पोलिस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्याचा सर्व अभ्यास करून दोन-चार दिवसात पोलिस त्यातून मार्ग काढतील, असेही त्यांनी सांगितले.
जमिनीच्या आरोपावर काय म्हणाल्या सुळे?
सुप्रिया सुळे कुंभारवळण येथे गेल्या असता, त्यावेळी तेथे काही गावकऱ्यांनी पुरंदर विमानतळाच्या परिसरात तुमची 120 एकर जमीन असल्याचा आरोप केला. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्यांनी हसत उत्तर दिले. आता सर्व डिजिटल आहे. तलाठ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कुणीही तपासून पाहू शकता. कुणाची जमीन कुठे आहे, हे लगेच कळते. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, विजय सुळे, रेवती सुळे, शरद पवार, प्रतिभा पवार या सहा जणांची जमीन नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
माझ्यावर दुसरा कुठलाच आरोप करायला नाही म्हणून असे आरोप होतात. त्याच्यात काही तथ्य नाही. म्हणून मी त्या आरोप करणाऱ्याला म्हटले तुला जर माझ्या 120 एकर जमिनीची माहिती मिळाली, तर सर्व जमीन तुला देऊन टाकते, कोऱ्या कागदावर सही करायला देखील तयार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शेतकऱ्यांचे समाधान होईपर्यंत जमीन हस्तांतरण करू नये
देशातील, महाराष्ट्रातील कुठल्याच विकासाला आमचा विरोध नाही. पण, विकास अशाच ठिकाणी व्हावा जिथे शेवटच्या शेतकऱ्याचे समाधान होईल. जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत सरकारने कुठल्याही उपक्रमासाठी जमीन हस्तांतरण करू नये. मग तो पुरंदरचा एअरपोर्ट असू दे किंवा हवेलीचा रिंग रोड असू दे. राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे. जे काही कराल ते लोकांना विश्वासात घ्या. शेतकऱ्यांचा मान सन्मान करा. महाराष्ट्र सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही खबरदारी सरकारने घेतली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.