
Pune News : पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. देशातील अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्था आयआयएम मुंबई (IIM Mumbai) आता पुण्यात आपले नवे केंद्र सुरू करणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या Dean Committee आणि Academic Council कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा निर्णय अधिकृत झाला आहे.
पुण्यात आयआयएम मुंबईचे केंद्र स्थापन होणे ही केवळ पुण्यापुरतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेतील एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. पुणे हे Oxford of the East म्हणून ओळखले जाते. अत्याधुनिक संशोधन केंद्रे, वेगाने वाढणारी स्टार्टअप संस्कृती, बहुराष्ट्रीय कंपन्यांची उपस्थिती आणि समृद्ध शैक्षणिक वारसा या पार्श्वभूमीवर आयआयएम मुंबईचा कॅम्पस पुण्यात स्थापन होणे हे शहरासाठी एक नैसर्गिक पाऊल मानले जात आहे.
उद्योग-व्यवसायात नवा उन्मेष
या केंद्रामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण थेट दाराशी उपलब्ध होईल. उद्योजकतेला चालना मिळेल. तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यवस्थापन कौशल्यांचा आधार मिळून त्यांचे यशस्वी व्यवसायांत रूपांतर करता येईल. हा उपक्रम स्वावलंबी भारत या संकल्पनेला पूरक ठरणार असून विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनालाही बळकटी देणार आहे.
आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले की, ‘आमचा प्रयत्न राहील की शैक्षणिक वर्ष 2026 पासून पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम तसेच अल्पावधी कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करता यावेत. ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभारी आहोत. यामुळे आयआयएम मुंबईला ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाच्या दिशेने मोलाचे योगदान देता येईल.”
‘नॉलेज कॉरिडॉर’ची नवी संकल्पना
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुण्यात आयआयएम मुंबईचे केंद्र स्थापन होणे ही अभिमानाची बाब आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि पुणे हे तंत्रज्ञान व शिक्षणाचे केंद्र आहे. या दोन्ही शहरांमध्ये निर्माण होणारा ‘Knowledge Corridor’ हा देशाच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी नवा पर्व ठरेल. महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवी ऊर्जा मिळेल आणि नव्या पिढीसमोर संधींचे विस्तीर्ण क्षितिज खुले होईल’.
पुणे अनेक दशकांपासून शिक्षणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. आता तंत्रज्ञान, उत्पादन व आयटीचे बळकट हब म्हणूनही ते वेगाने उदयास येत आहे. या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करून आयआयएम मुंबईने पुण्यात नवा कॅम्पस स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील तरुणाईसाठी नव्या संधींचा आणि जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाचा पाया ठरणार आहे.
FAQ
पुण्यात आयआयएम मुंबई केंद्र स्थापन होण्याचा निर्णय कधी घेण्यात आला?
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला आयआयएम मुंबईच्या Dean Committee आणि Academic Council कडून मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय 21 सप्टेंबर 2025 पूर्वी अधिकृत झाला.
पुण्यात आयआयएम केंद्र का स्थापन होत आहे?
पुणे हे ‘Oxford of the East’ म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे त्याची समृद्ध शैक्षणिक परंपरा, स्टार्टअप संस्कृती, संशोधन केंद्रे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची उपस्थिती यामुळे आयआयएमसाठी हे नैसर्गिक ठिकाण आहे.
या केंद्रामुळे काय फायदे होतील?
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण मिळेल, उद्योजकतेला चालना मिळेल, स्टार्टअप्सना बळ मिळेल आणि ‘विकसित भारत 2047’ च्या दृष्टिकोनाला पाठबळ मिळेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.