
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून वरिष्ठ पातळीवरील प्रशासनात खांदेपालट सुरू झाला. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. या आधी 1 एप्रिल रोजी 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्य
.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
1. अस्तिक कुमार पांडे (IAS:RR:2011)- आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई यांची MMRDA, मुंबई सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. आर.एस.चव्हाण (IAS:SCS:2013)- यांची नियुक्ती आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.
3. राहुल गुप्ता (IAS:RR:2017) सह व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर यांची जिल्हाधिकारी, हिंगोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. सत्यम गांधी (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. विशाल खत्री (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, राळेगाव उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या आधी 1 एप्रिल रोजी कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
1. इंदुराणी जाखर – पालघर जिल्हाधिकारी
2. नेहा भोसले – रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
3. भारत बास्टेवाड – रोजगार हमी योजना, नागपूर
4. राजेंद्र भारूड – अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग
5. लक्ष्मी नारायण मिश्रा – जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी
6. निधी पांडे – व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग
7. वैष्णवी बी – अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.