
Uddhav Thackeray Raj thackeray Morcha Planning: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला एकिकडे पावसाळी अधिवेशन सुरू असलं तरीही दुसरीकडे सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची.
शिवसेनेच्या UBT गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष एकाच मंचावर एकत्र येणार असून, निमित्त असेल ते म्हणजे विजयी मेळाव्याचं. हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून शिकवण्यासंदर्भातील शासन आदेश रद्द करण्यासाठी दोन्ही सेनांनी 5 जुलै रोजी मोर्चा पुकारला होता, मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांनी यासंदर्भातील दोन्ही शासन आदेश रद्द केले. ज्यानंतर ठाकरे बंधूंकडून या मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार असल्याची बाब जाहीर करण्यात आली.
हेसुद्धा वाचा : Uddhav-Raj Melava: कोण कुठे बसणार? कोणीची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं 15 मुद्द्यांवर एकमत
कशी आहे या विजयी मेळाव्याची रुपरेषा?
- व्यासपीठावर फक्त पक्षप्रमुख आणि सहभागी होणाऱ्या पक्षांचे पक्षाध्यक्ष आसनस्थ होणार.
- व्यासपीठावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश्याध्यक्ष आणि काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ तसेच सीपीआय पक्षाचे प्रकाश रेड्डी हे आसनस्थ होणार आहेत. तसेच शेकापचे जयंत पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती.
- वरळी डोममध्ये जवळपास 7 ते 8 हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे.
- वरळी डोमच्या हॉलमध्ये तसेच हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावरही एलईडी स्क्रीनिंग लावण्यात येणार.
- मोठी गर्दी झाल्यास वरळी डोममध्ये जागा शिल्लक राहिली नाही तरी बाहेरही उभे राहून कार्यक्रम पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीन्स लावण्यात येणार.
- पार्किंगसाठी वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांच्या पार्किंगची उपलब्धता आहे.
- वरळी डोमच्या समोर कोस्टल रोडच्या पुलाखाली दुचाकी पार्क करण्याची व्यवस्था करण्यात येणार.
- महालक्ष्मी रेसकोर्समध्येही पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येणार असून तिथे बसेस आणि बाहेरून येणाऱ्या मोठ्या गाड्या पार्क करण्याची व्यवस्था करण्यात येणार.
- कार्यक्रम जय्यत पद्धतीने व्हायला हवा हा नेत्यांचा मानस असल्याने तशी तयारी सुरू आहे.
- या कार्यक्रमात चकोरची साउंड सिस्टीम वापरली जाणार असून बाळासाहेबांच्या सगळ्या कार्यक्रमातही आणि राज ठाकरेंच्या कार्यक्रमात हीच साउंड सिस्टीम वापरली जाते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.