digital products downloads

इंधनाचे पैसे आगाऊ दिले तरच पेट्रोल मिळणार: आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कंपन्यांची डीलर्सना सूचना; 50% पंप बंद पडण्याची भीती – Pune News

इंधनाचे पैसे आगाऊ दिले तरच पेट्रोल मिळणार:  आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कंपन्यांची डीलर्सना सूचना; 50% पंप बंद पडण्याची भीती – Pune News



इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रालाही बसत आहेत. या युद्धामुळे इंधनाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना इंधनासाठी आगाऊ पैसे देण्याची अट घातली आहे. यामुळे पुणे शहरातील 50 टक्के पेट्रोल पंप बंद पडून इंधनाची आणीबाणी उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातच गॅस आणि इंधन पुरवठा यावर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. पुण्यात देखील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच आता इंधनाचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. पुणे शहरातील विविध पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणाऱ्या डीलर्सना पेट्रोल कंपनीने इंधनाचे पैसे आगाऊ दिले तरच पेट्रोल पंपाच्या गाड्यांमध्ये इंधन भरले जाईल अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील 50 टक्के पेट्रोल पंप आगामी काळात बंद राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय म्हणाले ऑल इंडिया पेट्रोल डिझेल संघटनेचे प्रवक्ते? ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी याविषयी बोलताना सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल पंप चालक आणि मालक यांना विविध पेट्रोल वितरित करणाऱ्या कंपनीने इंधन भरण्यासाठी आगाऊ रकमेची मागणी केली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी संबंधित पेट्रोल पंप मालकांनी इंधनाची पैसे आगाऊ दिल्यानंतरच त्यांना गाड्यांमध्ये इंधन भरू दिले जाणार आहे असे सूचित केले आहे. मात्र, पेट्रोल पंप चालक आणि मालक यांची आर्थिक परिस्थिती आगाऊ पैसे देण्याची नाही ही वस्तुस्थिती आहे. पुणे शहरात साधारण 550 पेट्रोल पंप असून त्यातील 50 टक्के पेट्रोल पंप या नियमामुळे लवकरच बंद राहतील असे दिसत आहे. इंधनाचा साठा मुबलक उपलब्ध असताना अशाप्रकारे अचानक अगाऊ पैसे पेट्रोल पंप चालकांकडून घेणे योग्य नाही. याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी विनंती आम्ही केली आहे, असे ते म्हणाले. 7-8 दिवसांची क्रेडिट लाईनही बंद उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल पंप चालकांना 7-8 दिवसांचे क्रेडिट मिळत होते. पण आता पैसे भरल्याशिवाय पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश तेल कंपन्यांनी पाठवला आहे. यामुळे पेट्रोल पंप चालकांची मोठी अडचण झाली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp