digital products downloads

‘इतिहासाला पुन्हा उजळणी, तो काळ पुन्हा येऊ दे’, म्हणत राज ठाकरेंनी शेअर केला बोलका फोटो; निमित्त काय?

‘इतिहासाला पुन्हा उजळणी, तो काळ पुन्हा येऊ दे’, म्हणत राज ठाकरेंनी शेअर केला बोलका फोटो; निमित्त काय?

Raj Thackeray Post : महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीचा मुद्दा असो किंवा विरोधकांचे कान टोचणं असो, प्रत्येक मुद्द्यावरून ठाम आणि तितक्याच परखड भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी कोणत्याही राजकीय मुद्द्यावर त्यांनी भाष्य न करता त्यांच्यातील कलाकार सर्वांपुढं आणला. कलात्मक बाजू सर्वांपुढं आणताना एक जुनी आठवण त्यांनी पोस्टच्या माध्यमातून मांडत एका फोटोमागची गोष्ट सांगितली. ठाकरेंही ही पोस्ट पूर्णपणे अराजकीय असली तरीही त्या पोस्टच्या अगदी अखेरीस त्यांनी लिहिलेली ओळ पाहता त्यांनी मराठी भाषेवरून दिलेला संदेशही सर्वांच्याच लक्षात आला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Add Zee News as a Preferred Source

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय लिहिलं? वाचा जसंच्या तसं…

‘काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर.
तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं ! 

घडलं असं की 1989 साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची. 

असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो. 

पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ. 

Raj Thackeray

एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती. 

आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं. 

Raj Thackeray

मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…’

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp