digital products downloads

इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाकपचे आंदोलन: अमेरिका-इस्रायलच्या कृतीचा निषेध, भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याची मागणी – Amravati News

इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाकपचे आंदोलन:  अमेरिका-इस्रायलच्या कृतीचा निषेध, भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याची मागणी – Amravati News



भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत सोमवारी, ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध करावा, आपली अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाची परंपरा कायम ठेवावी आणि भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक सोनारकर आणि जिल्हा सचिव सुनील मेटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाकप आणि त्यांच्याशी संलग्न जनसंघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. गेल्या पंधरवड्यापासून अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ले करत आहेत. इराणने प्रत्युत्तर दिले असले तरी, हा हल्ला एकतर्फी होता आणि अमेरिकेनेच तो सुरू केला, असे आंदोलकांनी म्हटले. अमेरिकेची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून ते एक प्रकारचे साम्राज्यवादी आक्रमण असल्याचे निदर्शनकर्त्यांनी स्पष्ट केले. आंदोलकांनी अमेरिकेला साम्राज्यवादी देश संबोधत, आखाती देशांतील तेल आणि इतर साधनसंपत्ती हडपण्यासाठी तसेच डॉलरचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी अमेरिका जगाला वेठीस धरत असल्याचा आरोप केला. भविष्यात भारतालाही याची गंभीर किंमत मोजावी लागू शकते, त्यामुळे भारताने वेळीच सावध होऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. देशाचे शीर्षस्थ नेतृत्व सध्या यावर भूमिका घेत नसल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनात भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य विनोद जोशी, जया मंडवधरे, प्रा. प्रसेनजीत तेलंग, जिल्हा सहसचिव प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, सागर दुर्योधन, जिल्हा कौन्सिल सदस्य जे. एम. कोठारी, शहर सचिव सुनील घटाळे, संजय मंडवधरे, चांदूर रेल्वे तालुक्याचे सचिव सतीश चौधरी, तिवसा तालुका सचिव प्रकाश सोनोने, तसेच माकपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष पांडे, जिल्हा सचिव रमेश सोनुले, प्रभाकर आकोटकर आणि नितीन काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp