
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिर परिसर प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने शुक्रवारी (दि. २७) दुमदुमून गेला. पहाटे ५ वाजता मंगल आरती झाली. श्री श्री राधा मदन गोपालजींसह श्रीराम, लक्ष्मण, जानकी आणि हनुमंताच्या उत्सव विग्रहांना विशेष पीतांबर, मौल्यवान अलंकारांनी विभूषित करण्यात आले. दुपारनंतर ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा आणि राम भजनांचा जयघोष सुरू झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन नाचू लागले. सायंकाळी ७ वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. प्रभूंच्या विग्रहांना गाईचे दूध, दही, तूप, मध आणि विविध फळांच्या रसाने महाअभिषेक झाला. ‘रामकथेच्या श्रवणाने होते चित्ताचे शुद्धीकरण’: मुंबईहून आलेले इस्कॉनचे जी. बी.सी. सदस्य गौरांग प्रभू यांनी दोन दिवस रामकथा सांगितली. “प्रभू श्रीराम हे आदर्श होते. रामकथेच्या श्रवणाने माणसाच्या अंतःकरणातील विकारांचा नाश होऊन चित्ताचे शुद्धीकरण होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. ^वैष्णव संप्रदायात ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नवमी तिथी असते, तोच दिवस रामनवमी उत्सवासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. प्रभू रामांचा जन्म दुपारी १२ वाजता झाला. त्यामुळे ज्या दिवशी दुपारी १२ वाजता नवमी तिथी पूर्णपणे अस्तित्वात असते, तोच दिवस जन्मोत्सवासाठी शास्त्रशुद्ध ठरतो. याच नियमांचे पालन करून इस्कॉनमध्ये हा सोहळा झाला. – नरसिंह कृपादास, इस्कॉन
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



