
Uddhav Thackeray On Eknath Shinde : राज्यात मराठी आणि हिंदीचा मुद्दा चिघळलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली. पुण्यातल्या गुजराती समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या समोर ही घोषणा दिली. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेचा उद्धव ठाकरे यांनी जाहीर समाचार केला. ‘आवाज मराठी विजय’ मेळाव्यात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर जबरदस्त टीका करत पुन्हा एकदा त्यांचा जाहीर असा उल्लेख केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या जय गुजरातच्या नाऱ्याचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. जी व्यक्ती हिंदीच्या मुद्दयाला विरोध करत नाही ती व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पाईक कशी असेल असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. एकनाथ शिंदेवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘पुष्पा’ चित्रपटा प्रमाणे डायलॉगबाजी केली. पुष्पा चित्रपट तुम्ही पाहिला असेल दाढीवरून हात फिरवत म्हणतो, ‘झुकेगा नहीं साला’, तसे हे गद्दार म्हणत आहे की, उठेगा नहीं साला. कुछ भी बोलो उठेगा नही. अरे कसा उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं, असे उद्दव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंचे हा डायलॉग ऐकून सभागृहात एकच हशा पिकला.
काल एक गद्दार म्हणाला, जय गुजरात. किती लाचारी करायची. आपला मालक आला म्हणून, त्याच्यासमोर ‘जय गुजरात’ म्हणणारा गद्दार, आपल्या बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल?” त्यामुळे आताच डोळे उघडा. नाहीतर कायमचे मिटतील. आता आलेली जागा जाणार असेल, तर स्वतःला मराठी आईची मुलं म्हणून नका, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
‘तुम्ही आता ‘जय श्रीराम’ म्हणायला लागलात, पण ‘जय जय रघुवीर समर्थ’, ज्यांनी आम्हाला शिवकलं, त्या रामदास समर्थ यांनी आम्हाला रामाची भक्ती शिवकली. राजकारणातील हे व्यापारी आहेत. वापरा अन् फेका. काल एक गद्दार म्हणाला, ‘जय गुजरात’! किती लाचारी करायची’, अशी टीका उद्व ठाकरेंनी केली. आगामी महापालिका निवडणुका पाहता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना जवळ केलं. अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलीय. वापरायचं आणि फेकायचं एवढंच उद्धव ठाकरेंना माहित. असा टोलाही म्हस्केंनी लगावला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.