
ठाकरे गटात आता काही उरले नाही, त्यांचे सर्वच लोकं आमच्यासोबत येणार आहेत. त्यांचे मेन नेते यांचीही शिंदेसेनेत येणार आहेत. आता त्यांचे मेन नेते म्हणजे कोण हे सांगण्याची गरज नाही, मुख्य नेत्यांचा 8 दिवसात शिंदेसेनेत प्रवेश होणार आहे. तर ठाकरे गटाचे बडबड
.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की, ठाकरे गटाचे बडबड करणारे नेते 2 ते 3 दिवसांमध्ये शिंदेंसोबत दिसतील. तर खासदार नरेश म्हस्केंनी तिकडे ठाकरे आणि राऊत सोडून कुणीच उरणार नाही असा दावा केला आहे.
ठाकरे, राऊतांना सोडून सर्वच येणार
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, उबाठाचे उरलेली पूर्ण सेनाच काही दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये दिसणार आहे. ठाकरे गटात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना सोडून कुणीही उरणार नाही. बाकी सर्व जण एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार आहेत. ठाकरे गटातील केवळ खासदार नाही तर जिल्हाप्रमुख, नगरसेवक माजी आमदार यांच्यासह अनेक नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार आहेत.
हे आहेत ठाकरेंचे 9 खासदार
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल देसाई, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे संजय दीना पाटील, परभणीचे संजय जाधव, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम राजेनिंबाळकर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, यवतमाळ-लोकसभाचे खासदार संजय देशमुख तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर हे आहेत. यांच्यासह ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची एकनाथ शिंदेंची तयारी
विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र, तत्पूर्वीच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘ऑपरेशन टायगर’ची तयारी सुरू आहे. या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा संकेत देखील दिले आहेत. आता या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे सहा खासदार आगामी संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर
‘ऑपरेशन टायगर’ होणारच मात्र टप्प्याटप्प्याने- सामंत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम पाहून अनेक नेते आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दाखवत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात चालते, हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत, हे निश्चित आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात संकेत दिले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ होणार आहे. मात्र ते टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.