digital products downloads

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कमी मतांनी पराभूत झालेले मुंबईतील उमेदवार; यादीतील दिग्गजांची नावे जाणून शॉक व्हाल

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कमी मतांनी पराभूत झालेले मुंबईतील उमेदवार; यादीतील दिग्गजांची नावे जाणून शॉक व्हाल

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण ढवळून निघाले आहेत.  मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 90 जागा पदरात पाडून घेतल्या. शिंदेच्या शिवसेने 29 जिंकल्या आहेत. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 पेक्षा  जागा जिंकल्या आहेत.  उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. असे असले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसला पराभवाचा देखील  फटका देखील बसला आहे. उद्धव ठाकरेंचे काही दिग्गज उमेदवार पराभूत देखील आहेत. जाणून घेऊया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कमी मतांनी पराभूत झालेले उमेदवार कोण आहेत? 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना विरुद्ध शिवसेना UBT अशी 44 ठिकाणी लढत झाली. यात 34 जागी ठाकरेंच्या उमेदवारांना यश आले, तर 10 ठिकाणी शिवसेनेने बाजी मारली. यात काही जागांवर अटीतटीची लढत झाली. विशेषतः दादर पश्चिमेकडील प्रभाग 191 मध्ये उद्धवसेनेच्या माजी महापौर आणि माजी आ. विशाखा राऊत आणि सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव-सरवणकर यांच्यात केवळ २०० मतांचा फरक असून राऊत यांना मतदारांनी निवडून दिले.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांची यादी

1 प्रभाग 7-सौरभ घोसाळकर 797 मतांनी पराभूत
2 प्रभाग 19-लीना गुढेकर 876 मतांनी पराभूत
3 प्रभाग 25 – सुप्रिया गाडगीळ 934 मतांनी पराभूत
4 प्रभाग 63-देवेंद्र आंबेकर 538 मतांनी पराभूत
5 प्रभाग 65 -प्रसाद आयरे 1 हजार 82 मतांनी पराभूत
6 प्रभाग 125 – सतीश पवार 569 मतांनी पराभूत
7 प्रभाग 126 -शिल्पा भोसले 781 मतांनी पराभूत
8 प्रभाग 148-प्रमोद शिंदे 1 हजार 91 मतांनी पराभूत
9 प्रभाग 168 सुधीर खातू 769 मतांनी पराभूत
10 प्रभाग 176-हर्षदा पाटील 943 मतांनी पराभूत
11 प्रभाग 179-दीपाली खेडकर 503 मतांनी पराभूत
12 प्रभाग 180 -स्मिता गावकर 935 मतांनी पराभूत
13 प्रभाग 190 – वैशाली पाटणकर 121 मतांनी पराभूत
 14 प्रभाग 42- प्रणिता निकम 1 हजार 22 मतांनी पराभूत

दरम्यान, राजकीय उलथापालथीनंतर झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळवून शिवसेना UBTच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर हजेरी लावली. रश्मी ठाकरे यांनी सर्व विजयी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे औक्षण करून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना UBTचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एकत्रपणे मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेनेच्या कठीण काळात पक्षाशी एकनिष्ठ राहून विजय मिळवणाऱ्या या शिलेदारांचे रश्मी ठाकरे यांनी विशेष कौतुक केले.   

तर, दुसरीकडडे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी सत्कार करण्यात आला. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं औक्षण केलं. यावेळी ‘शिवतीर्थ’वर मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. सत्ताधाऱ्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली, तरी नवी मुंबईत आम्ही खातं उघडलं, याचा मला अभिमान आहे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp