
सिंधुदुर्गातील ठाकरेंचे मोठे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनी दसऱ्याच्या दिवशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रवेश पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थ
.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात गेल्या काही दिवसांत ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. अनेक स्थानिक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. आता राजन तेली यांनी देखील धनुष्यबाण हाती धरला आहे. नारायण राणेंचे खंदे समर्थक ते कट्टर विरोधक असा राजन तेलींचा राजकीय प्रवास राहिला आहे.
विधानसभेला केसरकरांकडून राजन तेलींचा पराभव
नारायण राणे यांचे एकेकाळचे समर्थक असलेल्या तेली यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा होता. त्यानंतर ते उद्धव ठाकरे गटाचे सक्रिय नेते म्हणून कार्यरत राहिले. मात्र अखेर दसऱ्याच्याच मेळाव्याच्या दिवशी त्यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले.
राणेंचे खंदे समर्थक ते कट्टर विरोधक असा तेलींचा प्रवास
शिवसेनेतून राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडली. मग ते काँग्रेसमध्ये गेले. नारायण राणे यांचे खंदे समर्थक ते कट्टर विरोधक असा तेली यांचा प्रवास राहिला आहे. काँग्रेसमधून ते भाजपमध्ये गेले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. मग ते ठाकरेंच्या शिवसेनेत गेले आणि आता ते शिंदे गटात दाखल झाले आहेत.
कोण आहेत राजन तेली?
- राजन तेली यांचा जन्म 25 जून 1970 साली कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला.
- 1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केले.
- 1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद.
- 1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.
- 1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले.
- 1997 साली त्याच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी.
- 2005 साली राणे समवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राणे समवेत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश.
- 2007 साली विधान परिषद आमदार.
- 2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेचा चेअरमन.
- 2016 साली राजन तेली यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत राज्य सचिव पद दिलं.
- 2020 साली भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद.
- 2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक राजन तेली यांनी भाजपकडून लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी त्यांचा पराभव केला.
- 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.