digital products downloads

उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात मोठा धक्का: राज्य सचिव संजय लाखेंचा राजीनामा, संजय राऊत-अंबादास दानवेंवर केले गंभीर आरोप – Maharashtra News

उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात मोठा धक्का:  राज्य सचिव संजय लाखेंचा राजीनामा, संजय राऊत-अंबादास दानवेंवर केले गंभीर आरोप – Maharashtra News


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य सचिव आणि जालन्यातील नेते डॉ. संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिवपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने मराठवाड्यात पक्षाला मोठा धक्का बसला असून, त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून पक

.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचे दिसून येत आहे. विशेषत: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक दिग्गज नेतेपक्षाची साथ सोडून महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला होता. सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता मराठवाड्यातही ठाकरे गटाला हादरा बसला आहे.

राजीनामा पत्रात काय म्हणाले संजय लाखे?

आपण मला जालना लोकसभेचे तिकीट देतो पक्ष प्रवेश करा, शिवबंधन बांधा आणि माझ्याबरोबर निर्धास्त काम करा, काळजी करू नका, असा शब्द साधारण 14 महिन्यांपूर्वी दिला होता. संजय राऊत साहेब यांनी जयंत पाटील यांच्याशी विशिष्ट समझोता करून सांगली पदरात पाडून घेत आकांडतांडव नौटंकी करत अटक पराभव पदरात पाडून घेतला आणि अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत जिंकणारी जालना आपल्याकडे येणार नाही हा तिकडील ‘शिष्यत्व धर्म’ निभावला. विजयी जागा पदरात पाडून न घेता पक्षाला आणि मला ठेंगा दाखवला… आपल्या डोळ्यासमोर.

त्यानंतर आपण मला सचिव पदाची जबाबदारी दिली पण गेल्या 13/14 महिन्यात वेळोवेळी विनंती करूनही कसलीच संघटनात्मक जबाबदारी आपण सोपवली तर नाहीच पण जिल्हा, विभाग, राज्य संघटनेतून मला हळूहळू संपूर्णतः बेदखल करण्यात आले. सामनामध्ये कुठल्याही कार्यक्रमाच्या बातम्यात उपस्थित असूनही इतर सचिवासह माझे नाव येणार नाही ही रचना प्रस्थापित व्यवस्थेने ठरवून केली. आणि वाचून जाणकार मला हसत राहिले. सामनाच्या बातमीत नाव नाही तर पक्षात स्थान नाही असे सांगत राहिले.

अंबादास दानये सध्या जो चोरलेला कार्यक्रम मराठवाड्यात राबवतोय त्यांची संकल्पना biological पालकत्व लक्ष्मण वडले आणि माझे आहे! विनायक राऊत यांना हे पूर्णपणे अवगत आहे. पण या कार्यक्रमाचे नपुसंक जनकत्व मिरवत अंबादास दानवे फुकाचे कौतुक पदरात पाडून घेत आहेत आणि लक्ष्मण वडले किंवा मी संघटनात्मक व्यासपीठावर कुठेही दिसणार नाहीत. जिल्ह्यातही आम्हाला बोलावले जाणार नाही अशी भित्री व्युहात्मक तटबंदी करून… हा तर अतिशय केविलवाणा आणि हास्यास्पद प्रकार आहेच! पण मनपा ‘वार्ड’चा बेडूक किती फुगणार? आपल्या सोंगट्या पुढे करून मराठवाड्यातील संघटना मात्र कमकुवत करणार… हळूहळू संपवणार हे नक्की! आणखी बरेच काही… पण तुर्तास इतकेच……

अतिशय निराशाजनक… स्वप्नभंग.! आणि यामुळे जिल्हा, विभाग, राज्यात, शिवसेना भवनात होणारी दररोजची मानसिक, सामाजिक, राजकीय मानहानीकारक कुचंबणा ! सहन करण्याच्या पलिकडे…. आपल्याला अनेकदा सांगूनही, संघटना वाढीसाठी कार्यक्रम सुचवून, न्याय मिळाला नाही. म्हणूनच मी सचिव पदाचा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा राजीनामा देत आहे, असे संजय लाखे पाटील पत्रात म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp