digital products downloads

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पडला राजीनामा; काय होणार परिणाम?

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पडला राजीनामा; काय होणार परिणाम?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला गळती लागली आहे. त्यात आता तेजस्वी घोसाळकर यांनीही पक्षाचा राजीनामा दिल्याने ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या तेजस्वी घोसाळकर,आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची चर्चा रंगली आहे. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी पक्षबदल केले आहेत. या यादीत आता माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाचीही भर पडली आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक विभागप्रमुख आणि विभाग संघटकांवर नाराजी व्यक्त करत तेजस्विनी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याचं समजत आहे. यापूर्वीही तेजस्विनी यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती, परंतु पक्षाकडून दखल न घेतल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिल्याचं कळत आहे. 

घोसाळकरांच्या हाती कोणता झेंडा?

– तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी
– ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत
– ठाकरे पक्षाच्या दहिसर विधानसभेच्या महिला प्रमुख होत्या
– उद्धव ठाकरे कुटुंबाशी घोसाळकर कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत
– 2024 च्या सुरुवातीला अभिषेक घोसळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती
– स्थानिक विभागप्रमुख आणि विभाग संघटकांवर तेजस्वी यांनी नाराजी व्यक्त केलीये

दरम्यान घोसाळकर जुने नेते आहेत. स्थानिक नेतृत्वात भांड्याला भांडे  लागत असते, पण तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरे नेतृत्वापासून दूर जातील असे वाटत नाही, अंस अंबादास दानवे यांनी म्हंटलय

स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. आता त्यांनी राजीनामा दिल्यांतर भाजपमध्ये जाणार की शिवेसेने याकडे लक्ष असेल..

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp