
राजन साळवी यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरे यांना राजकीय कानफट असल्याची टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले होती. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व काय? असा प्रश्न देखील कदम यांनी उपस्थित केला होता. रामदास कदम यांच्या या टीकेला उद्ध
.
उद्धव ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणे हे नैतिकतेला धरून नाही. कधी काळी आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे हे तुमचे नेते होते. कधी काळी त्यांच्या सोबत बसून तासनतास चर्चा आपण केली आहे. विधानसभेत पराभूत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवले होते. एवढी कृतज्ञता जर माणसात नसेल तर त्यांच्यात माणुसकी शून्य आहे. अशा शब्दात संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार केला आहे.
फुगून गावाकडे जाऊन बसायला भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे नाहीत
भास्कर जाधव हे कोकणातील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. बैठकीसाठीचा निरोप त्यांना उशिरा गेला. त्यामुळे ते बैठकीला हजर राहू शकले नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ते ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र नेटवर्कचा कमी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्या जवळच्या नातेवाइकाचे लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आमच्या पक्षात चर्चा झालेली आहे. आमच्या पक्षात तेवढी लोकशाही आहे. रुसून – फुगून गावाकडे जाऊन बसायला ते एकनाथ शिंदे नाहीत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
सरकार मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोप
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, ” दिल्लीतील चेंगराचेंगरी हे अधिकाऱ्यांचे अपयश आहे. महाकुंभ हा एक पवित्र उत्सव आहे. लोक मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज मध्ये येतील यासाठी भाजपने पक्षाच्या प्रचारासाठी नियंत्रण दिले. त्यांनी 50 कोटी लोकांना आमंत्रित केले पण व्यवस्था काय होती?… लोकांना तासन्तास रस्त्यावर अडकून थांबवावे लागले. चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला आहे. 60,000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. त्यांना कोण शोधणार? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. दिल्ली रेल्वे स्थानकावरील आकडेवारी वरुन ही त्यांनी आरोप केले आहेत. सरकार मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.