
महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्या या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे. हे सर्व सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिले गेले होते. उद्या सभागृहात निरोप दिला जाणाऱ्या सदस्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या निरोपामुळे शिवसेना (यूबीटी) ची विधानपरिषदेतील उपस्थिती आणि मांडणीत बदल होणार आहे. तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही कार्यकाळ संपत असल्याने, या रिक्त होणाऱ्या जागांवर आता कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्या निरोप देण्यात येणाऱ्या आमदारांमध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे. या नऊ आमदारांची निवड 14 मे 2020 रोजी करण्यात आली होती. उद्या निरोप दिले जाणारे विधानपरिषदेचे आमदार १) उद्धव ठाकरे – शिवसेना (UBT) २) नीलम गोऱ्हे – शिवसेना (शिंदे) ३) अमोल मिटकरी – राष्ट्रवादी (अजित पवार) ४) शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी (शरद पवार) ५) राजेश राठोड – काँग्रेस ६) संदीप जोशी – भाजप ७) दादाराव केचे – भाजप 8) रणजितसिंह मोहिते-पाटील – भाजप ९) संजय केनेकर – भाजप पुढील राजकीय वाटचाल कशी? येत्या १३ मे रोजी या सदस्यांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपल्यानंतर या ९ जागा रिक्त होतील. हे सर्व सदस्य विधानसभा कोट्यातून निवडून आलेले असल्याने, आगामी काळात विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार या जागांचे वाटप होणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक ४ जागा आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांची गणिते आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



