
शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यानंतर आता रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हॉटेल रिट्रीटमध्ये झालेल्या आमदारांच्या सभेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, एका रात्रीत
.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कोणते पद घेतले नाही. त्यांनी ती सगळी पदे शिवसैनिकांना दिली. मात्र, आता परिस्थिती उलटी आहे. बाप मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता रामदास कदम आउट. त्यावेळी सगळा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. बाळासाहेब असते तर हे होऊ दिले नसते, असेही रामदास कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल, या उद्धव ठाकरेंच्या विधानावर रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली. मनसेचे सहा नगरसेवक फोडणे हे महाराष्ट्राच्या मनात होते का?” वरळी मतदारसंघात तुमच्या मुलाला मनसेने पाठींबा दिला, आणि राज ठाकरे यांच्या मुलाविरुद्ध तुम्ही दादरमध्ये उमेदवार देऊन त्याला पाडलेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली. दोगलेपणा पहायचा असेल तर उद्धव ठाकरेंकडे बघा. उद्धव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे. मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील असेही रामदास कदम म्हणाले.
मुंबईतील मराठी माणूस उद्धव ठाकरेंमुळे हद्दपार
मुंबईतील मराठी माणूस उध्दव ठाकरेंमुळे हद्दपार झाल्याचा आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे. महानगरपालिकेत 25 वर्षात सत्तेत असताना तुम्ही काय केले? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला. महानगर पालिका उद्धव ठाकरेंकडे कधीच येणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.
राष्ट्रवादींच्या युतीवर काय म्हणाले कदम?
दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवर देखील रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार परिपक्व राजकीय नेते आहेत. कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा याबाबत त्यांचा कोणी हात धरु शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात ठेवण्यापेक्षा त्यांनी एक घाव दोन तुकडे केले. मातोश्रीवर या उलट सुरु आहे, असे रामदास कदम म्हणाले.
हे ही वाचा…
बाळासाहेब गेल्यानंतर आम्हाला आपलेपण दिसले नाही:केंद्रीय मंत्रीपद जाधवांना देत एकनाथ शिंदेंनी मोठे पणा दाखवला- भरत गोगावले
बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांचे दैवत होते. बाळासाहेब ठाकरे यांची काम करण्याची जी काय पद्धत होती, ती उद्धव ठाकरेंमध्ये आम्हाला दिसून आली नाही. बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले की ते आपलेपणाने विचारपूस करत होते, त्यांच्यानंतर ती आपलेपणाची भावना जानवली नाही अन् त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली, असे शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…
संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही:NCP एकत्रीकरणाच्या चर्चेला शरद पवारांकडून ब्रेक; अजितदादा म्हणाले- प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी ब्रेक लावला आहे. संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.