
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना सर्वात शेवटच्या रांगेत बसवल्याचा मुद्द्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे यांना असलेला मान आणि रुबाब आठवून देत, आता हिंदुत्व आणि विचा
.
केशव उपाध्ये म्हणाले की, जेव्हा उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीमध्ये होते, तेव्हा त्यांना मोठा सन्मान होता. “त्यावेळचा रुबाब आठवा. भाजपचे सर्व मोठे नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना मान देत होते. लोकसभा निवडणुकीवेळी तर खुद्द अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती,” असे उपाध्ये यांनी सांगितले.
आताची परिस्थिती पाहता, गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरेंना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हटले नाही, किंवा राहुल गांधी किंवा सोनिया गांधी मातोश्रीवर आले नाहीत, असा सवाल उपाध्ये यांनी केला. “या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत. शेवटी हिंदुत्व आणि विचारधारा सोडून उद्धव ठाकरेंच्या पदरात फक्त मानहानीची रांग पडली आहे,” असे ते म्हणाले.
शिंदे गट बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी
दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसवल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाने यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. या घटनेला उद्धव ठाकरेंचा अपमान मानत, शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते आज शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर पोहोचले. यावेळी आमदार मनीषा कायंदे आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी “उद्धव ठाकरेंना माफ करा, सडका मेंदू साफ करा” अशा घोषणा दिल्या. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे स्वतःचीच अवहेलना करून घेत असल्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर येऊन त्यांची माफी मागावी, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.
‘उद्धव ठाकरेंच्या आसनावरील टीका भंपक’
राहुल गांधी यांच्या सादरीकरणावेळी उद्धव ठाकरे यांच्या आसन व्यवस्थेवरून झालेल्या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. स्क्रीनसमोर बसून पाहणे त्रासदायक असल्याने आम्ही मागे बसलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांना तांत्रिक गोष्टींची जाण असल्याने त्यांनी मागे बसून सादरीकरण पाहणे पसंत केले. भाजपच्या आयटी सेलवर टीका करताना ते म्हणाले, ही लोकं भंपक आहेत आणि त्यांना हे समजले पाहिजे.
नरेश म्हस्केंची पोस्ट काय?
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…शिवरायांचा वारसा सांगता ना रे…खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन, शेवटच्या रांगेत बसलात रे???? बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला, अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला, तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे??काँग्रेस ने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे….तुमच्यापेक्षा एकेक खासदार वाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे महाराष्ट्राची दिल्ली त जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे…थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे, महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली,ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे….. अशी पोस्ट X वर नरेश म्हस्के यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.